Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 14 फेब्रुवारीला
Ahmednagar College | नगर : दर्शक । :अहमदनगर महाविद्यालय अहिल्यानगर व अहमदनगर महाविद्यालय माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा शनिवार, दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते 2025 पर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी केले आहे.
या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता बी. पी. एच. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रजनीश बार्नबस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, जुन्या आठवणींना उजाळा देणारा संवाद, स्नेहभोजन तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन जीवनातील आठवणी, मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठी व पिढ्यान्पिढ्यांतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यक्रमास उपस्थिती नोंदवण्यासाठी https://hosturl.info/1fcfkM या लिंक वर व्हिजिट करून आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com