Top News

Colonel Parabs School Nagar | कर्नल परब’स शाळेत आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 Colonel Parabs School Nagar | कर्नल परब’स शाळेत आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Colonel Parabs School Nagar | कर्नल परब’स शाळेत आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद



नगर : दर्शक । 

शहरातील कर्नल परब’स शाळेमध्ये यंदाही विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देणाऱ्या आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाला पालकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले होते.


       यावर्षी प्रदर्शनासाठी ‘स्पेक्ट्रम’ ही संकल्पना (थीम) निवडण्यात आली होती. या थीमनुसार विद्यार्थ्यांनी रंग, कल्पना आणि सर्जनशीलतेचा सुरेख मिलाफ साधत विविध डिस्प्ले साकारले. कागद, माती, रंग, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


      कर्नल परब’स शाळेच्या संचालिका गीता परब या दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच शिक्षणाबरोबरच कला ही जीवनात किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना कळावे, या उद्देशाने अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करत असतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
      

प्रमुखाध्यापिका अर्पिता रननवरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास व्हावा, तसेच त्यांनी स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप द्यावे, यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो.


       प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करत प्रदर्शनाचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या हॅन्डमेड वस्तूंना मोठी मागणी असून, भविष्यातही अशाच प्रकारचे प्रदर्शन सातत्याने भरवावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.


      विशेष आकर्षण ठरले ते सनबीम्सच्या लहान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पिगी बँक, कुल्लड, तसेच विविध प्रकारच्या फुलांच्या बिया. या वस्तूंनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान झळकत होता.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم