Top News

Digital Media | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी इकबाल शेख यांची वर्णी ; अभिनंदनाचा वर्षाव..!

Digital Media | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी इकबाल शेख यांची वर्णी; अभिनंदनाचा वर्षाव..!

Digital Media | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी इकबाल शेख यांची वर्णी ; अभिनंदनाचा वर्षाव..!







Digital Media | नगर : दर्शक ।

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी, अहिल्यानगर येथील 'एनटीव्ही मराठी न्यूज चॅनल'चे मुख्य संपादक इकबाल शेख यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. इकबाल शेख यांच्या निवडीमुळे डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



इकबाल शेख हे गेल्या २८ वर्षांपासून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या विभागांत वरिष्ठ पत्रकार म्हणून अखंडपणे कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव आणि पत्रकारांच्या विविध अडचणी व समस्या सोडवण्यासाठी असलेली त्यांची तत्परता, यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.



डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील डिजिटल क्षेत्रातील अग्रगण्य संघटना मानली जाते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत संघटनेचे मोठे जाळे पसरलेले आहे. इकबाल शेख यांनी या संघटनेच्या विस्तारासाठी आणि मजबुतीसाठी मोठे योगदान दिले असून, त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेत ही नवी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.



इकबाल शेख यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी आपण आगामी काळात अधिक जोमाने कार्य करू, असा विश्वास निवडीनंतर इकबाल शेख यांनी व्यक्त केला आहे.



डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात इकबाल शेख यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वामुळे संघटनेची ताकद महाराष्ट्रभर वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा सूर या बैठकीत उमटला.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने