Top News

Sarda College | उत्कृष्टपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा महाविद्यालय नेहमी सन्मान करते – रजिस्ट्रार अशोक असेरी

 Sarda College | उत्कृष्टपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा महाविद्यालय नेहमी सन्मान करते – रजिस्ट्रार अशोक असेरी


Sarda College | उत्कृष्टपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा महाविद्यालय नेहमी सन्मान करते – रजिस्ट्रार अशोक असेरी






 Sarda College |  नगर : दर्शक । 
   हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयात नुकतेच विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून नेहमी केले जाते. 



प्रत्येक विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असून महाविद्यालयातील प्रत्येक कर्मचारी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करण्याचे काम आपापल्या परीने करत असतात. कामाच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कर्मचारी करत असतात. महाविद्यालय नेहमीच उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहते, असे गौरवोद्गार नुकतेच महाविद्यालयातील परीक्षा विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिक सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून महाविद्यालयाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला, त्या प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. अशोक असेरी यांनी काढले. त्यानिमित्त महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सौ. कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.



        सौ. कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मला महाविद्यालयाचे काम करत असताना नेहमी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळत असते. त्यामुळे प्रत्येक कामात येणाऱ्या समस्या सोडवताना अडचणी येत नाहीत. त्यांच्या या पुरस्काराबद्दल हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक सर, मानद सचिव श्री. संजय जोशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डॉ. रमेश झरकर, ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित आदींनी त्यांचे कौतुक केले.



       सदर कार्यक्रमास सौ. भारती वायाळ, श्री. शिवाजी भडके, श्री. अतुल सामल, श्री. वसंत शिंदे, श्री. कार्तिक चौव्हाण, श्री. ओमकार वाघमारे, श्री. बाजीराव माळी, श्री. अभिषेक देशपांडे, शबाना बागवान, सौ. सुचिता तांबोळी, सौ. रेखा कवळे, श्रीमती शीतल नायकु, श्री. योगेश कुलकर्णी, श्री. अजय सुरवसे, श्री. बाळू नागापुरे आदी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


     सदर कार्यक्रमाचे आभार पेमराज सारडा महाविद्यालय कर्मचारी समिती सदस्य श्री. ओमकार वाघमारे यांनी मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने