Kedgao | केडगाव मध्ये सिनेअभिनेत्री श्रुती मराठे यांच्या उपस्थितीत महिला दिन होणार साजरा
Kedgao | नगर : दर्शक ।
केडगाव येथील श्री छत्रपती फाउंडेशन आणि श्री गणेश व दत्त देवस्थान ट्रस्ट, अंबिका नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नूतन वर्ष आणि जागतिक महिला दिन निमित्त परिसरातील महिलांचा गुणगौरव सोहळा पार पाडणार आहे.
वॉर्ड नंबर 16 मधील नगरसेविका सौ.वर्षा सुजित काकडे दुसर्या नगरसेविका सौ.सुनीता महेंद्र कांबळे तसेच सौ.अश्विनी अमोल येवले आणि सौ.पूजा विजय पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता चेडे हॉस्पिटल चौक, अंबिका नगर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
दरवर्षीच श्री गणेश व दत्त देवस्थान तर्फे महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अहिल्यानगरच्या महापौर सौ. ज्योतीताई गाडे तसेच माजी महापौर सौ. शितलताई जगताप आणि सौ.धनश्री विखे यांच्या उपस्थितीत केडगाव परिसरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्याचे योजिले आहे. तसेच सिने अभिनेत्री श्रुती मराठे यांची प्रकट मुलाखत देखील होणार आहे.
तरी परिसरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेविका सौ .वर्षा काकडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.शारदा शेजुळ, सौ.निशा बोरगे, सौ.वसुधा देशपांडे, सौ.प्रतिमा कुलकर्णी, सौ.योगिता पवार, सौ.चारू आचारी आणि अंबिका नारी संघाच्या सर्व सदस्य परिश्रम घेत आहे.
.webp)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com