Top News

Sanman | विराज सासवडेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी विधानभवनात भेट

 Sanman |  जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याचे स्वप्न साकार : विराज सासवडेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी विधानभवनात भेट

Sanman | विराज सासवडेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी विधानभवनात भेट





Sanman |  नगर : दर्शक । 
 दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड जिद्द आणि गुणवत्ता दडलेली असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा धोत्रे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी विराज सुभाष सासवडे याने दिला आहे. आपल्या सुंदर हस्ताक्षराच्या बळावर जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत त्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून, या यशामुळे त्याचे एक मोठे स्वप्नही साकार झाले. विराजची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी विधानभवनात भेट घडून आली.



        विराज सासवडे याने यापूर्वीही हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले होते. त्यावेळी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी विराजचे सुंदर हस्ताक्षर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवले होते. विराजच्या हस्ताक्षराचे कौतुक करत अजित पवार यांनी विराज व त्याचे शिक्षक सचिन ठाणगे यांना भेटीसाठी आमंत्रण दिले होते. मात्र दुर्दैवाने ही भेट होण्यापूर्वीच अजित पवार यांचे निधन झाल्याने ती भेट अपूर्ण राहिली होती.



दरम्यान, यावर्षी पुन्हा एकदा जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विराजने आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी विधानभवनात विराजची भेट घडवून आणण्यात आली.



         यावेळी सुनेत्रा पवार यांनी विराजच्या सुंदर हस्ताक्षराचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण विराज सासवडेने घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.



विराजच्या या यशामुळे धोत्रे खुर्द गावासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



        या भेटीप्रसंगी शिक्षक सचिन ठाणगे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी, पंढरीनाथ तागड, पालक सुभाष सासवडे, जयदीप ठाणगे, नाथा कोळेकर योगेश वाव्हळ , नामदेव कोळेकर आदी उपस्थित होते. 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने