Top News

Art of Living Kids | आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे उन्हाळी सुट्टी मध्ये मुलांसाठी इंट्युशन प्रोग्रामचे आयोजन

  Art of Living Kids |  ५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी अंतर्ज्ञान विकासाची अनोखी संधी

Art of Living Kids | आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे उन्हाळी सुट्टी मध्ये मुलांसाठी इंट्युशन प्रोग्रामचे आयोजन






Art of Living Kids | नगर : आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे शहरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी “इंट्युशन प्रोग्राम” म्हणजे अंतर्ज्ञान प्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आला असून, ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम नगर शहरात यापूर्वी झालेले आहेत आता उन्हाळी सुट्टीमध्ये अंतर्ज्ञान प्रक्रिया शिबीर विशेष ठरणार आहे. शांत व एकाग्र मनातून योग्य वेळी योग्य विचार निर्माण होण्याची क्षमता म्हणजे इंट्युशन किंवा अंतर्ज्ञान (Sixth Sense) होय. सध्याच्या स्पर्धात्मक युगात मुलांमध्ये ही क्षमता विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आयोजकांनी सांगितले.



         या प्रोग्रामसाठी महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी शिबीर घेणारे अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहेत. कार्यक्रमामध्ये योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया यांच्या माध्यमातून मुलांची मानसिक एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच मुलांना आवडणारे सांघिक खेळ, विविध उत्साहपूर्ण क्रियाकलाप यांचाही समावेश करण्यात आला आहे.



हा इंट्युशन प्रोग्राम ११ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग ज्ञान क्षेत्र, गावंडे मळा, अहिल्यानगर येथे दररोज सायं. ४ ते ९ या वेळेत पार पडणार आहे. कार्यक्रमानंतर काही सत्रे ऑनलाइन पद्धतीनेही आयोजित केली जाणार आहेत.



          या प्रशिक्षणाद्वारे मुलांमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून रंग किंवा वस्तू ओळखणे, फोटो मेमरी विकसित करणे, मोबाईलचा वापर कमी करणे यांसारख्या कौशल्यांचा विकास होतो, असा दावा आयोजकांनी केला आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढून अभ्यासातील तणाव व भीती कमी होण्यास मदत होते. तसेच सर्जनशीलता, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्वात लक्षणीय बदल घडतो, असे अनेक पालकांचे अनुभव आहेत.



     आजपर्यंत हजारो मुलांनी या प्रोग्रामचा लाभ घेतला असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रोग्राम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९४२२२२०८७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने