कु. श्रद्धा अशोक डोळसे व सौ. शुभदा विशाल देवकर या दोघीं "डिझाईन एक्सलन्स" अवॉर्डने सन्मानित

कु. श्रद्धा अशोक डोळसे व सौ. शुभदा विशाल देवकर या दोघीं "डिझाईन एक्सलन्स" अवॉर्डने सन्मानित






  नगर - आय डी टी एज्युकेशन, नासिक या संस्थेमार्फत दशवार्षिक समारंभा निमित्ताने भव्य कार्यक्रमात इंटेरियर डिझायनर कु श्रद्धा डोळसे व सौ शुभदा देवकर या दोघी भगिनींना डिझाईन एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित केले. 



   प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते हा सन्मान श्रद्धाने केलेल्या सुंदर इंटेरियर डिझाइन्स व इंटेरियर या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यसाठी तसेच सौ शुभदा हिने फॅशन डिझायनिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दोघींचा हा सन्मान या संस्थेने केला. याप्रसंगी आर्किटेक्ट, शिल्पकार व सिने सेट डिझायनर श्याम लोंढे, संस्थेचे संस्थापक प्रा. महेंद्र शेवाळे, सौ स्नेहल शेवाळे उपस्थित आदी मान्यवर होते. 



   याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोंढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सौंदर्य हे आपल्या विचारात आणि कृतीत असते त्याचाच उपयोग करून आपण केलेली डिझाईन, कलाकृती ही बोलत असते. आपली कलाकृती, डिझाईनेच त्या कलाकाराविषयी सांगायला हवे आणि उत्तम इंटरियर डिझायनर, फॅशन डिझायनर आपल्या डिझाइन्स मधूनच वेगळेपण दर्शवितात. त्यांची कलाकृती हीच त्यांचे व्यक्त होण्याचे माध्यम असते. 





    यावेळी अभिनेते उदगीरकर यांनी मार्गदर्शन करताना आधी स्वतः सौंदर्य समजून घ्यावे कारण आपले विचार आपली कृती हेच आपल्या निर्मितीमध्ये परावर्तित झालेली दिसते. त्यामुळे प्रथम स्वतःला कलात्मक आणि सकारात्मक संदेश देत राहा. अभ्यासातील सातत्य आणि नाविन्याचा शोध यातून नक्कीच उत्तम निर्मिती होते. यावेळी संस्थापक प्रा. शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यामुळे आपले आयुष्य देखील आनंदी होते हे आवर्जून सांगितले.



     रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये भव्य मंचावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल श्रद्धाचे व शुभदाचे अभिनंदन प्रा. शिरीष मोडक, संजय जोशी, ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, श्यामसुंदर सारडा अॅड. दीपक शर्मा, लक्ष्मण देवकर, ज्ञानेश्वर काळे,अमोल खोले, सचिन हिवाळे, हरिभाऊ डोळसे, सोमनाथ देवकर, नंदकुमार देशपांडे, राजेंद्र टाक, आदींनी केले.