Top News

फ्रेंड्स कॉर्पोरेट क्रिकेट लीगमध्ये नगर चॅम्पियन व नगर डिस्ट्रिक्ट सिनिअर्सचा विजय

 फ्रेंड्स कॉर्पोरेट क्रिकेट लीगमध्ये नगर चॅम्पियन व नगर डिस्ट्रिक्ट सिनिअर्सचा विजय

फ्रेंड्स कॉर्पोरेट क्रिकेट लीगमध्ये नगर चॅम्पियन व नगर डिस्ट्रिक्ट सिनिअर्सचा विजय






नगर : रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी झालेल्या फ्रेंड्स कॉर्पोरेट क्रिकेट लीगमधील सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात शिवराज ऍडव्होकेट वॉरियर्स आणि नगर चॅम्पियन यांच्यात रंगलेल्या सामन्यात नगर चॅम्पियन संघाने थरारक विजय मिळवला.




या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शिवराज ऍडव्होकेट वॉरियर्स संघाने दमदार फलंदाजी करत ४ गड्यांच्या मोबदल्यात १६८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात नगर चॅम्पियन संघाने संयमी व आक्रमक खेळ करत ८ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा पूर्ण केल्या आणि सामना आपल्या नावावर केला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संजू आल्हाट याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.




        दुसऱ्या सामन्यात नगर डिस्ट्रिक्ट सिनिअर्स अहिल्यानगर संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ए बी ऍक्ट अहिल्यानगर संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही आणि संपूर्ण संघ १० बाद १३१ धावांवरच मर्यादित राहिला. परिणामी नगर डिस्ट्रिक्ट सिनिअर्स संघाने हा सामना जिंकत आपली ताकद सिद्ध केली. या सामन्यात तेजस करमरकर याने सर्वोत्कृष्ट खेळ करत सामनावीर किताब पटकावला.




       दोन्ही सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाप्रदर्शन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. लीगमधील पुढील सामने अधिक रंगतदार होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने