प्रगत माध्य.व उच्च माध्य. विदयालयाचा  12 वी विज्ञान शाखेचा चा निकाल 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 60 टक्के



नगर : दर्शक । ४ मे २०२६ ।  

दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत उच्च माध्यमिक विभाग इ. 12 वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.



      विज्ञान शाखेत विधाते हर्षवर्धन शिवाजी हा 85.67 टक्के घेऊन प्रथम क्रमांक, चन्ना वैभव प्रमोद हा 83.17 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक तर पोटदुखे ऋतुजा अशोक ही 76.67 टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच वाणिज्य शाखेचा निकाल 60 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत नामदे अवनी चित्तरंजन 86.50 टक्के घेऊन प्रथम क्रमांक, गुगळे कार्तिक राहुल 82.33 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक तर नागपाल मेहक विशाल 81.87 टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. 



          सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा विजया चंद्रकांत रेखे, सचिव किरण वैकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, खजिनदार उमेश चंद्रकांत रेखे, का. सदस्य महेश चंद्रकांत रेखे, उदयकुमार भणगे, उमेश नगरकर, प्राचार्य सुनिल पंडित, सर्व विभाग प्रमुख व हर्षाली देशमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.