Rahuri Election | राहुरीत भाजपची एकतर्फी लाट की अक्षय कर्डिले यांच्या विजयात मवीआचा हात?
नगर : दर्शक । दि ४ मे २०२६ ।
स्व.आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणूक प्रक्रियेत महायुतीने विशेषकरून भाजप नेतृत्वाने संपूर्ण नेतेमंडळींची ताकद राहुरीला लावून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी अतोनात प्रयत्न केले तेही अगदी अर्ज भरण्या पासून तर प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तर दुसरीकडे महाविकास आघाडीने गोविंद मोकाटे यांना एकाकी सोडलेले पहायला मिळाले त्यांनी एकटेच आपल्या कार्यकर्त्यांसोबत राहुरी पिंजून काढली त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून फक्त खासदार नीलेश लंके प्रचारासाठी आले बाकी संपूर्ण महाविकास आघाडीने राहुरीकडे पाहिलेच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिले आणि त्यांनी केलेल्या नियोजनामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे निवडणुकीतून माघार घेत बाहेर झाले शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते मंडळी बारामतीला सुनेत्रा अजित पवार यांच्या निवडणुकीत व्यस्त होते असे गृहीत धरून चालू ! अगदी शेवटच्या क्षणी गोविंद मोकाटे यांना मविआ तर्फे शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर राहुरीला प्राजक्त तनपुरे यांनी माघार जरी घेतली तरी त्यांचा पाठिंबा आणि त्यांचे कार्यकर्ते यंत्रणा कोणाच्या बाजूने काम करेल या निवडणुकीत तो उमेदवारच विजयी होण्याची शक्यता होती असे बोलले जाते व पालकमंत्री विखे पाटील यांनीही राहुरी पोटनिवडणूकसाठी मोठी फिल्डिंग लावलेली दिसत होती आणि ती निकालावरून स्पष्टच झाले.
नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघ येथे झालेल्या 2026 पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात मोठी छाप पाडली आहे. या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आपली मजबूत जनाधार सिद्ध केला आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, कारण ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नव्हती, तर ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेची लढत मानली जात होती. विशेष म्हणजे ही निवडणूक कर्डिले कुटुंबाच्या राजकीय वारशाशीही जोडलेली होती.
विक्रमी मताधिक्याने विजय
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. अखेरीस त्यांनी तब्बल 1,40,093 मते मिळवत स्पष्ट विजय नोंदवला.
त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना 27,506 मते मिळाली, तर इतर उमेदवार मोठ्या फरकाने मागे राहिले. या निकालामुळे भाजपने या मतदारसंघात आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा विजय केवळ निवडणुकीचा निकाल नसून भविष्यातील राजकीय दिशा दर्शवणारा आहे. विशेषतः विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय पार्श्वभूमी
राहुरी हा पारंपरिकदृष्ट्या कर्डिले आणि तनपुरे कुटुंबांमधील राजकीय संघर्षासाठी ओळखला जातो. या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमीही तशीच होती. भाजपकडून अक्षय कर्डिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे मैदानात होते.
शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली होती, त्यामुळे सहानुभूतीचा मुद्दाही कर्डिले यांच्या बाजूने गेला.
मतदारांचा स्पष्ट कौल
या निकालातून मतदारांनी स्पष्टपणे विकास, नेतृत्व आणि स्थिरतेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. कर्डिले यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रभावी प्रचार केल्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला.
दुसरीकडे, विरोधकांना मतदारांपर्यंत आपली भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्यात अपयश आल्याचे दिसून आले.
| Sr No | Candidate Name | EVM Votes | Postal Votes | Total Votes |
|---|---|---|---|---|
| 1 | Akshay Shivajirao Kardile | 139810 | 283 | 140093 |
| 2 | Mokate Govind Khandu | 27450 | 56 | 27506 |
| 3 | Cholake Santosh Eknath | 5675 | 15 | 5690 |
| 4 | Adv. Atharv Sahebrao Mhase | 1143 | 5 | 1148 |
| 5 | Raosaheb Sadaram Kheware | 7291 | 8 | 7299 |
| 6 | Suryabhan Alias Suresh Lambe | 1365 | 3 | 1368 |
| 7 | Hapase Mahesh Keshav | 2041 | 10 | 2051 |
| 8 | NOTA | 1630 | 2 | 1632 |
| Total | 186405 | 382 | 186787 | |

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com