श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत गायकवाड बापूसाहेब सुखदेव यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
नगर : दर्शक । ४ मे २०२६ ।
श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत ज्येष्ठ शिक्षक गायकवाड बापूसाहेब सुखदेव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित समारंभ अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री सुरेश क्षीरसागर सर अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष मा. श्री दीपक ओहोळ, व्हाईस चेअरमन मा. श्री श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार मा. श्री संजय कुलकर्णी, सदस्य मा. श्री स्वप्निल कुलकर्णी, मा. श्री सुनील जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य सौ. अनघा अत्रे मॅडम, माजी मुख्याध्यापक दुर्योधन कासार, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापिका सौ. वसुधा जोशी, पर्यवेक्षक श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या चारही शाळांमधील शिक्षक व कर्मचारी, तसेच गायकवाड सरांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वसुधा जोशी मॅडम यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात सुरेश क्षीरसागर म्हणाले की, गायकवाड सरांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानच नाही तर संस्कारांचीही रुजवण केली. त्यांची कार्यनिष्ठा, शिस्त आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी ही सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमात सहकारी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनीही गायकवाड सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. अनेकांनी सरांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात घडलेले बदल सांगितले. वातावरणात भावनिक क्षण निर्माण झाले होते.
यावेळी आपल्या मनोगतात गायकवाड बापूसाहेब सुखदेव यांनी सांगितले की, “शिक्षक म्हणून काम करताना मला विद्यार्थ्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. संस्थेने दिलेल्या संधीमुळेच मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडू शकलो. माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे प्रेम हेच माझे खरे यश आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संकेत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुनील रायकर यांनी केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com