अण्णाभाऊ साठेनगरला पाणी मिळाले पुन्हा; प्रशासनाची तातडीची कारवाई





अण्णाभाऊ साठेनगर, नान्नज येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावातील हातपंपाची तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. 



ग्रामपंचायत नान्नज येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री. जी. एस. पवार यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत त्वरित कार्यवाही करत दुरुस्तीचे काम मार्गी लावले. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक सहकार्य करत हातपंप पुन्हा कार्यान्वित केला.  



या दुरुस्तीच्या कामावेळी अण्णाभाऊ साठेनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. अनोप राजू साठे, महादेव अरुण साठे, संदीप साठे,किशोर साठे, विकास साठे, अमोल साठे, राजेंद्र विठ्ठल साठे, आकाश साठे, इस्माईल कुरेशी, यांसह अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.  


दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणी समस्येवर प्रशासनाने दाखवलेली तत्परता ही कौतुकास्पद असून, या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.