सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ज्ञान विज्ञान पुरस्कार
नगर : दर्शक । 3 मे 2026 ।
मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या नर जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा. बाबा बेलसरे म्हणतात, त्याप्रमाणे सतत 'मी' केले मीच कर्ता हा भाव ठेवल्यास तू कष्टी होशील तर, राम करता म्हणल्यास तुला यश प्राप्त होईल. म्हणूनच परमार्थात अहंकार हा मोठा अडसर आहे. असे प्रतिपादन डॉ सी.बी कुलकर्णी यांनी केले.
सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ.गौरी कुलकर्णी, कुमुदिनी बोपर्डीकर, लिलाताई गोविलकर, मंदाताई सोमणी, शोभा ढेपे, अँड.नीलिमा औटी,निरंजना देशमुख,सर्वोत्तम क्षीरसागर,अँड मनोहर केसकर,डॉ.कोलते सर, हरिश्चंद्र थिगळे, स्नेहल वेलनकर, मंदाताई कुलकर्णी, पुष्पा चितांबर, बाजीराव जाधव, शुभदा जागीरदार, पुष्पा कोरे, संतोष गोरे, श्रीकांत नाईक, हेमंत लोहगावकर, पांडुरंग कुलकर्णी, वैशाली भणगे, आदिनाथ जोशी,महापुरुष सर,चारुशीला करवंदे, बल भीम पांडव, उमेश कुलकर्णी अमोल हातवळणे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, आपण जे ज्ञान मिळवतो ते आपल्या उदर भरणासाठी असते.अनेक जण अनेक क्षेत्रात ज्ञानी झालेले आपण पाहतो. पण हे झाले व्यावहारिक ज्ञान पण खरे ज्ञान हे समर्थ सांगतात तसे आत्मज्ञान आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाला जीवनात सद्गुरूंची आवश्यकता असते.त्यांनी दिलेला अनुग्रह आनंदाने स्वीकारला पाहिजे.
मंचचे अध्यक्ष शरद कुलकर्णी यांनी सर्वांची स्वागत व प्रास्ताविक केले. तर सन्मानपत्रा चे लेखन पुष्प चितांबर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय सेक्रेटरी ज्योतीताई केसकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवेदिका भारती कुलकर्णी यांनी केला.तर आभार बाजीराव जाधव यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com