अन्यथा एसटी बस रोको आंदोलन करणार-सरपंच शरद पवार
नगर : दर्शक । दि ६ मे २०२६ ।
नगर-चिचोंडी पाटील येथील बस स्टॅन्ड चे काम अनेक दिवसापासून रस्त्याच्या कामामुळे प्रलंबित असल्याने प्रवासी विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांना तासन तास उन्हात ताटकळत उभा राहावे लागत आहे,
तरी महामंडळाने हे बस स्टॉप चे काम त्वरित पूर्ण करावे.तसेच चिचोंडी पाटील येथे नगरकडे व जामखेड कडे जाणाऱ्या सर्व बस थांबल्याच पाहिजे.अन्यथा बस रोको आंदोलन करणार असल्याचे प्रशासक/सरपंच शरद पवार व ग्रामस्थांनी म्हटले आहे.
अनेक दिवसपासून ग्रामस्थ हि मागणी करत आहेत पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे ग्रामस्थांची सहनशक्ती संपत आहे येत्या १५ दिवसात हेमागणी मान्य झाली नाहीत तर ग्रामस्थसह प्रशासक/सरपंच शरद पवार एसटी बस रोको आंदोलन चिचोंडी पाटील येथे करणार आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com