नगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन 

अभिनयातून माणसं वाचायला मिळाली - अभिनेते योगेश सोमण



नगर : दर्शक । 

"लेखन प्रशिक्षण दिग्दर्शन आणि अभिनय या सिने सृष्टीतील  टप्प्यात माझ्या दृष्टीने अभिनय हा हा "क्राफ्ट वर्क "मध्ये शेवटच्या पायरीवर आहे .तरीही अभिनयाने मला "चेहरा" दिला हे सत्य असले तरी माझ्या दृष्टीने अभिनयातून मला माणसं वाचायला मिळाले. त्यातून जीवन समृद्ध होत गेले" असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते ,नाट्य कलाकार व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी व्यक्त केले .अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्राचे पहिले पुष्प  गुंफताना"माझ्या भूमिकेने मला काय दिले" या विषयावर सोमन बोलत होते. 





        यावेळी वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटक जिल्हा ग्रंथालयाचे निरीक्षक रामदास शिंदे ,वाचनालयाचे कार्यवाह, विक्रम  राठोड ,उपाध्यक्ष दिलीप पांढरे, मसाप चे जिल्हा अध्यक्ष जयंत येलुलकर ,संचालिका प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी, संयोजिकाशिल्पा रसाळ, वैद्य राजा ठाकूर ,किरण आगरवाल, राहुल तांबोळी, कवि चंद्रकांत पालवे ,ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते.




              रसिक नगरकरांच्या गर्दीने गच्च भरलेल्या सभागृहात  जीवन प्रवासातील अनेक भूमिका विषयी बोलताना सोमण यांनी मंत्रमुग्ध केले. "लहानपणी प्रारंभी नाटकात राजा भरताची "प्रॉम्प्टर" म्हणून दुय्यम भूमिका मिळाली असताना स्टेजवर कब्जा मिळवण्याची" झिंग" या वाटेवर प्रेरक ठरली.नाटकामध्ये 25 वर्ष भूमिका करताना छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, चाणक्य यासारख्या महान व्यक्तींचा अभ्यास व अभिनयाच्या क्षमता यातून निर्माण होत गेल्या. नाट्यक्षेत्रातून सिनेक्षेत्रात पाऊल टाकताना मालिकांच्या माध्यमातून अल्पावधीत मला भूमिकांनी नवा चेहरा दिला. पुणे ते मुंबईचा हा प्रवास खडतर तसाच त्यात सामावल्यावर "शिप" मध्ये काम करणाऱ्या नोकरदारासारखा होता.               



  "डेली सोप" मध्ये भूमिका सुरू झाल्यावर "नांदा सौख्य भरे" मधील सात्विक भूमिका ते "क्राइम पेट्रोल " मधील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका यातून वेगवेगळ्या प्रेक्षक वर्गात मी त्यांच्या घरातील एक" चेहरा "झालो. त्यातून चैनल ची ताकद मला समजली. हिंदी चित्रपट सृष्टीत "दृश्यम" च्या माध्यमातून भूमिकांमध्ये प्रवेश करताना मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील फरक, व्यावसायिक शिस्त, यातील फरक मला माझ्या समजला. माझ्या चेहऱ्यामुळे प्रथमच मला "उरी" चित्रपटातून संरक्षण मंत्री मनोहर  पर्रीकर यांची भूमिका मिळाली. या "डिफेन्स मिनिस्टर"भूमिकेमुळे आयुष्यभरासाठी मला नवीन ओळख या अभिनयाने दिली. इतकेच नव्हे तर गोव्यात गेल्यावर जनसामान्यातील माणसाला ती किती जवळची वाटली याचा अनुभव अनेक वेळा आला .




            पुढे बोलताना सोमण यांनी नाट्य सेनेसृष्टीच्या प्रवासात संतश्रेष्ठ तुकारामांच्या "आनंद डोह "या प्रयोगातून सद्गुरु ,अध्यात्म व अदृश्यशक्ती तुन मी नव्हे तर परमात्म्यामुळे माझ्याकडून करून घेतलेले कामातून माझा अहंकार गळून पडला. आपण हाती घेतलेला कामाचा "संकल्प "सोडून लेखन, सादरीकरण, घंटानाद या साऱ्यांचा घडत गेलेला चमत्कार हा माझा नव्हे तर ब्रम्हांडातील अदृश्य शक्तीचा असल्याचे सांगून या सगळ्यातून माझ्यातील व्यक्तीमत्त्वाच्या स्निग्धतेत भर पडत गेली असल्याचे प्रांजळपणे व्यक्त केले .



              यावेळी उद्घाटक रामदास शिंदे यांनी "जिल्हा वाचनालयाची वसंत व्याख्यानमालेची परंपरा ही माणूस घडवण्याची अखंड यात्रा आहे. उत्तंग व्यक्तिमतची माणसे ,त्यांचा प्रवास यावेळी ऐकणेही मोठी पर्वणी असून रसिक नगरकरांनी स्वतःला या अनुभवातून समृद्ध करून घ्यावे असे आवाहन केले.




             कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रसिद्ध सिनेकालाकार मोहनिराज  गटणे व ज्येष्ठ रंगकर्मी पीडी कुलकर्णी ,जयंत येलूलकर  विभागीय कार्यवाह पदी निवड झाल्या बद्दल यांचा जिल्हा वाचनालयाचे वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास साहित्य ,नाट्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य रसिक उपस्थित होते. प्रास्ताविक  आणि आभार  प्रा.ज्योती कुलकर्णी तर परिचय शिल्पा रसाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.