Hindi Sanmelan Nagar |  कथा, कविता सादरीकरण, चर्चा सत्र, पुस्तके प्रकाशन : दुसरे राष्ट्रीय हिंदी लघुकथा संमेलन

Hindi Sanmelan Nagar | कथा, कविता सादरीकरण, चर्चा सत्र, पुस्तके प्रकाशन : दुसरे राष्ट्रीय हिंदी लघुकथा संमेलन

 







 Hindi Sanmelan Nagar |  नगर : दर्शक । 
: कथा, कविता, चर्चा सत्रे, पुस्तके प्रकाशन, परिसंवाद, पुरस्कार वितरण, गौरव सन्मान इत्यादी भरगच्च कार्यक्रमातून दुसरे राष्ट्रीय हिंदी लघुकथा संमेलन उत्साहात संपन्न झाले. स्नेहालय, डॉ. शंकर केशव आडकर चॅरिटेबल ट्रस्ट, आचार्य जगदीश चंद्र मिश्र लघुकथा संशोधन केंद्र, हिंदी सुरजन सभा यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसीमधील स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात संपन्न झालेल्या या नावीन्यपूर्ण संमेलनात देशभरातील हिंदी लघुकथाकार, संशोधक, कवी, पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, समीक्षक, भाषा प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




         २१ व्या शतकातील पहिले शतकोत्तर रौप्य महोत्सवातील हिंदी लघुकथांचे चैतन्याचे नवीन स्वर या महत्त्वपूर्ण विषयावरील परिसंवाद चर्चासत्राचे उद्घाटन नवी दिल्लीतील हिंदीचे वरिष्ठ साहित्यकार डॉ. बलराम अग्रवाल यांनी केले. डॉ  ऋचा शर्मा यांचे ‘एक दिन हर दिन’ हा लघुकथा संग्रह, जयपूरच्या अनिता सैनी यांच्या ‘मुक्त फिर भी’, ठाण्याच्या निर्मोही फडके यांचा अनुदित कहानी संग्रह, अनुवादक डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांच्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन झाले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



        हिंदी ही कोट्यवधींची मातृभाषा, संपर्क व संवादाची भाषा असून भारतीय संस्कृती, मूल्ये, परंपरा, संतकाव्य, भक्तीपर साहित्य, लोककथा, म्हणी यांमधून सांस्कृतिक वैभव फुलविण्याबरोबर विविध प्रांत, जाती, समाजांना जोडण्याचे कार्य हिंदी भाषेने केले. त्यामुळे या भाषेचा सन्मान, संवर्धन व प्रचार करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे, असे विविध वक्त्यांनी प्रतिपादन केले.



          इंडिया नेट बुक्स पब्लिकेशन, नोएडा येथील संचालक डॉ. संजीव कुमार, वरिष्ठ कथाकार डॉ. प्रमिला वर्मा, सुनीता शेवगावकर, मुंबईच्या अलका पांडे, भोपाळच्या श्रीमती कांता रॉय, डॉ. रमेश यादव, डॉ. अलका अग्रवाल, ममता माली प्रिया बादल श्रुती बेडेकर मृदुल भटनागर सतीश श्रीवास्तव नरेंद्र छाबडा डॉ. मियिलेश अवस्थी, डॉ. राजकुमार घोटड,    




  राजस्थानच्या पुष्प कुमारी आदी प्रभृतींनी लघुकथेद्वारे होणाऱ्या प्रभावाविषयी विचार मांडले. स्नेहालय इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी लघुकथेद्वारे बालमनावर होणाऱ्या संस्कारांचे महत्त्व पटवून देणारी सादरीकरणे केली. विविध मान्यवरांनी लघुकथांचे सादरीकरण केले. आचार्य जगदीश चंद्र मिश्र सन्मान समितीचे विविध पुरस्कार, लघुकथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. संयोजक डॉ. गिरीश कुलकर्णी, ऋचा शर्मा, अशोक कुरापाटी यांनी स्वागत केले. डॉ. पौर्णिमा बेहरे, डॉ. वृषाली मांडे, आनंद त्रिपाठी, वनिता मोकाटे, वीणा दिघे, डॉ दीपा कुचेकर, मनवीर कौर, आस्था शर्मा यांनी विविध सभांचे सूत्रसंचालन केले.



        सर्वश्री राजीव शर्मा, डॉ. संजय राठोड, सुनील कात्रे संगीता सानप, माऊली अशोक अकोलकर,  कृतुजा काळे ॲडव्होकेट उमेश नगरकर यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.