Mukundnagar News | देशात शांतता राहण्यासाठी विशेष प्रार्थना करणार मुकुंदनगर येथे हज यात्रेकरूंचा सत्कार



Mukundnagar News | देशात शांतता राहण्यासाठी विशेष प्रार्थना करणार मुकुंदनगर येथे हज यात्रेकरूंचा सत्कार



Mukundnagar News |  नगर : दर्शक । 

 हज यात्रेस पोहोचल्यावर मक्का मदिना येथे देशात सुख-समृद्धी व शांतता नांदावी, यासाठी विशेष प्रार्थना करणार असून, बंधुभाव-एकता टिकून राहावी यासाठीही आपण प्रार्थना करणार असल्याचे शेख सज्जादभाई व शेख परवेजभाई यांनी सांगितले.




मुकुंदनगर येथील प्रसिद्ध बिल्डर हाजी रऊफभाई बिल्डर व हाजी सईदभाई यांच्या हस्ते हज यात्रेस जाणारे शेख सज्जाद व शेख परवेज यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोहम्मद मजहर व इतर मान्यवर उपस्थित होते.




शेख सज्जादभाई म्हणाले, परमेश्‍वराने मला खूप काही दिले आहे. आता मी निश्‍चय केला होता की, हज यात्रेस जावे. त्याप्रमाणे तो क्षण प्रत्यक्षात आला आहे, याचा आनंद होत आहे. परमेश्‍वराने प्रत्येकाला हज यात्रा करण्याची संधी द्यावी, अशी यानिमित्ताने आपण प्रार्थना मक्का मदिना येथे पोहोचल्यावर करू.