Pune Congress | प्रशांत जगताप व दीप्ती चवधरी यांच्यावर काँग्रेस नेतृत्वाचा विश्वास; पदग्रहण समारंभ उत्साहात
Pune Congress | पुणे : दर्शक । ( प्रतिनिधी) ।
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. मल्लिकार्जुन खरगे साहेब, देशाचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय श्री. राहुलजी गांधी, खा. श्रीमती प्रियंकाजी गांधी, राष्ट्रीय महासचिव श्री. के.सी. वेणुगोपालजी व माननीय प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, पुणे शहर व जिल्हा प्रभारी श्री. सतेज (बंटी) पाटील साहेब, माजी मंत्री श्री. विश्वजीत कदम साहेब यांच्या मान्यतेने श्री. प्रशांत जगताप व सौ. दीप्तीताई चवधरी यांची पुणे (पश्चिम) शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संघटन सृजन अभियानांतर्गत शहरातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधून आमची नियुक्ती होणे ही खरोखर अभिमानाची बाब आहे. आज आदरणीय श्री. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे दोन्ही शहराध्यक्षांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली.
या समारंभाच्या निमित्ताने श्री. विश्वजीत कदम, श्री. प्रशांत जगताप, सौ. दीप्ती चवधरी यांनी पत्रकार बंधू भगिनींसोबत संवाद साधला. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, वाढती वाहतूक समस्या, प्रदूषण अशा असंख्य समस्यांनी पुणेकर हैराण आहेत, पुणे शहराच्या या दुरावस्थेला भारतीय जनता पक्षाची धोरणशून्य सत्ता कारणीभूत आहे.
देशातील जनता महागाईने होरपळली जातेय, तरुणाई बेरोजगारीने पिचलाय, शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात भरडला जातोय. देशाचे पंतप्रधान मात्र परदेशात जाऊन चॉकलेट वाटण्यात मग्न आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हा निर्धार आज काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षांनी व्यक्त केला. तसेच, काँग्रेस नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत करू हा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या पदग्रहण समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. मोहनदादा जोशी, प्रदेश प्रवक्ते श्री. गोपालदादा तिवारी, महानगरपालिकेतील गटनेते श्री. चंद्रकांत कदम, नगरसेविका दिपाली डोख, नगरसेविका सायरा शेख, नगरसेवक काशिफ सय्यद, मोहसीन शेख, मजहर मणियार, प्रवक्ते हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे,
महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, महेबूबभाई नदाफ, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक साहिल केदारी, स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे, नगरसेविका अश्विनी लांडगे, नगरसेविका वैशाली भालेराव, उस्मान तांबोळी, प्रदेश सरचिटणीस अमीर शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com