Shrirampur News | बंद पडलेले घड्याळ शहराच्या विकासासाठी अपशकून ठरणार का ? संजय छल्लारे
श्रीरामपूर:(शौकतभाई शेख)
शहरातील नेहरु भाजी मार्केट येथील टॉवरवरील घड्याळ दुरुस्तीसाठी काल सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी भाजपचे संजय छल्लारे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक आशिष धनवटे, दिपक चव्हाण, रवी पाटील, श्रीनिवास बिहाणी, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय छल्लारे म्हणाले, श्रीरामपूर शहरात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामूळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले.परंतू त्यांच्या स्मारकासमोरच असलेले हे घड्याळ कित्येक दिवसांपासून बंद पडलेले आहे.
हिंदू समाजात बंद पडलेले, घड्याळ हे अपशकुन मानले जाते. म्हणजे आता हे घड्याळ शहराच्या विकासासाठी अपशकुन ठरणार का ? असा प्रश्न देखील त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
याप्रसंगी रवींद्र गुलाटी म्हणाले, या घड्याळासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, ही सुरवात आहे, यापुढे शहराच्या विविध भागातील जनतेच्या अनेक प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवत मोठी आंदोलने करणार आहोत याची सत्ताधाऱ्यांनी व पालिकेने सवय करून घ्यावी असेही ते म्हणाले.
यावेळी आशिष धनवटे, रुपेश हरकल, तिलक डुंगरवाल आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.या आंदोलनात तेजस बोरावके, भैय्या भिसे, संजय साळवे, विजय आखाडे, रवि पंडित, विशाल आंभोरे, बंडूकुमार शिंदे, तिलक डुंगरवाल, रियाज पोपटिया, ऍड. मिलिंद धीवर, सिद्धांत छल्लारे, राहुल पांढरे, दिपक कदम, सुजीत सुखदरे, विकास डेंगळे, कुंदनसिंह जुनी, अमन अलघ, शरद गवारे, विशाल पापडीवाल, अकिल पठाण, रोहित नाईक, उमेश छल्लारे, दत्ता करडे, रवि पंडित, विशाल आंभोरे, तेजस उंडे, गणेश छल्लारे, गोपाल अहिरराव, शिवा छल्लारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com