विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकासाची संधी
Summer Camp | नगर : दर्शक । दि ६ मे २०२६ ।
विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा आणि त्यांच्यातील विविध कौशल्यांचा विकास घडावा या उद्देशाने डान्स युनिव्हर्स इन्स्टिट्यूट व कराळे क्लब यांच्या वतीने ‘समर कॅम्प 2026’चे आयोजन करण्यात आले आहे.
हा कॅम्प दि. 10 मे 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत कराळे क्लब हाऊस, न्यू लिंक रोड, सावेडी बसस्थानकाजवळ येथे होणार आहे.
या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांतील उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून शारीरिक, मानसिक, सामाजिक व सर्जनशील विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
‘फिटनेस झोन’ अंतर्गत डान्स फिटनेस, झुंबा, स्ट्रेंथ अँड फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग, मजेदार वर्कआउट चॅलेंजेस, ब्रेन जिम तसेच योग, ध्यान व रिलॅक्सेशन यांचा समावेश आहे.
‘सोशल अँड लाईफ स्किल्स झोन’मध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपक्रम, सार्वजनिक वक्तृत्व व स्टोरीटेलिंग, टीम बिल्डिंग, सोशल मीडिया अवेअरनेस, मनी मॅनेजमेंट बेसिक्स आणि शिस्त व एकाग्रता वाढविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच ‘आर्ट अँड क्रिएटिव्ह झोन’मध्ये ड्रॉइंग, पेंटिंग, पेपर क्राफ्ट, मोजॅक आर्ट, टाय अँड डाय, फॅशन डिझाईनिंग, स्क्रॅपबुक आणि विविध सर्जनशील प्रकल्पांचा समावेश आहे. ‘गेम्स अँड अॅडव्हेंचर झोन’मध्ये इनडोअर-आउटडोअर खेळ, अॅडव्हेंचर डे, निसर्गभ्रमंती तसेच पूल पार्टी व अक्वा डान्ससारखे आकर्षक उपक्रम ठेवण्यात आले आहेत.
याशिवाय ‘फन अँड एंटरटेनमेंट झोन’मध्ये रील मेकिंग वर्कशॉप, अभिनय व अभिव्यक्ती खेळ, टॅलेंट शो, थीम डे अॅक्टिव्हिटीज आणि दररोज वेगवेगळ्या मजेदार स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सध्या कॅम्पसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालक व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सागर अलचेट्टी (मो. 9637139552) व कुणाल सुर्यवंशी (मो. 9359019264) कराळे क्लब (मो. 7385223421) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com