मिलिंद कुलकर्णी यांचा सेवापूर्ती सोहळा समर्थ प्रशालेत संपन्न
नगर : दर्शक । दि ६ मे २०२६ ।
सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील प्रयोगशाळा परिचर श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी तब्बल ३६ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून निवृत्ती घेतली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त प्रशालेत आयोजित सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. सुरेश क्षीरसागर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापिका सौ. वसुधा जोशी मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून श्री. मिलिंद कुलकर्णी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने त्यांना मानपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला. तसेच संस्थेच्या चारही शाळांच्या वतीनेही त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या चारही शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर विविध मान्यवरांनी श्री. कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये माजी मुख्याध्यापिका सौ. अनघा अत्रे मॅडम, संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे खजिनदार श्री. संजय कुलकर्णी, श्री समर्थ विद्यामंदिर सांगळे गल्ली प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अजय महाजन, माजी प्राथमिक मुख्याध्यापक श्री. दुर्योधन कासार, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. धनश्री गुंफेकर,
प्रशालेतील अध्यापिका सौ. अनुराधा शास्त्री मॅडम, समर्थ सांगळे गल्ली येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ. शारदा होशिंग, सावेडी उच्च माध्यमिक विभागातर्फे सौ. वर्षा पाठक, माध्यमिक विभागाचे ग्रंथपाल श्री. विष्णू रंगा तसेच श्री. मिलिंद कुलकर्णी यांचे बंधू श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी श्री. कुलकर्णी यांची कन्या सौ. ऋतुजा देशपांडे यांनी आपल्या वडिलांविषयी भावनिक मनोगत व्यक्त केले, तर नात कु. विदुला या चिमुकलीने आपल्या आजोबांवर सुंदर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. सुरेश क्षीरसागर यांनी जुन्या कर्मचाऱ्यांनी केलेले निस्वार्थी कार्य हे नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरावे आणि त्यांनी त्याप्रमाणे आचरण करावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विभागाच्या प्राध्यापिका सौ. प्राजक्ता केसकर यांनी केले, तर माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ. चैताली नवले यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री. मिलिंद कुलकर्णी यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. दीपक ओहळ तसेच संस्थेच्या चारही शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर श्री. मिलिंद कुलकर्णी यांच्या तर्फे सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या भोजनाचा सर्व उपस्थितांनी मनमुराद आस्वाद घेतला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com