डॉ.आशुतोष गारुडकर यांचे कोरियातील  आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन सादर



नगर : दर्शक । 

अहिल्यानगरचे प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ.आशुतोष अरुण गारुडकर यांनी सियोल,दक्षिण कोरिया येथे झालेल्या प्रतिष्ठित AMWC Korea 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला.यापरिषदेत त्वचारोग,सौंदर्य चिकित्सा,केसांचे उपचार,अँटी-एजिंग आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ सहभागी झाले होते.




            या परिषदेत डॉ.गारुडकर यांनीकेसगळतीमध्ये एक्सोसोम्सआणिचेहऱ्यावरील पिग्मेंटेशनसाठी सर्वात आधुनिक उपचारपद्धतीया विषयांवरील आपले संशोधन कार्य सादर केले.कोरियन स्किनकेअर,एक्सोसोम्स,पीडीआरएन,लेझर आणि आधुनिक त्वचा-पुनरुज्जीवन उपचारांबाबत त्यांनी जागतिक तज्ज्ञांशी चर्चा केली.




            डॉ.गारुडकर हे डर्ममेडिका क्लिनिक,दिल्लीगेट व केडगाव,अहिल्यानगर येथे त्वचा,केस,पिग्मेंटेशन,लेझर आणि अँटी-एजिंग,लाँगेविटी उपचार सेवा देतात.आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात अद्ययावत व सुरक्षित उपचार पद्धती अहिल्यानगर मधील रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.



          नुकतेच ते नगरला परतले यावेळी अनेकांनी त्यांचा सत्कार करून शुभेछया दिल्या