रोटरी क्लब सेंट्रलतर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स डे,सीए डे व शेतकरी दिन उत्साहात साजरा
नगर - रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर्स डे, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) डे व शेतकरी दिन मोठ्या उत्साहात आनंद ऋषिजी हॉस्पिटल अहिल्यानगर येथे साजरा करण्यात आला.
यावेळी समाजातील आरोग्य, अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.आशिष भंडारी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ.सुधा कांकरिया उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि शेतकरी यांच्या समाजजीवनातील अमूल्य योगदानाचा गौरव करत सेवा, समर्पण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश दिला.
यावेळी आनंद ऋषिजी हॉस्पिटल मधील सुमारे ५० डॉक्टरांचा सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच रोटरी क्लबमधील डॉक्टर सदस्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
नुकतेच चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या युवा सीएंचा सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच देशाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत प्रगतशील शेतकऱ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आनंदऋषिजी हॉस्पिटलचे डॉक्टर व प्रशासकीय अधिकारी तसेच क्लबचे पीडीजी रो. शिरीष रायटे,रो. विनोद बोरा, डिस्ट्रिक्ट टीआरएफ डायरेक्टर रो.हरीश नय्यर,डॉ.प्रीती नय्यर,आयपीपी रो. सुनील काटारिया, रो.डॉ.श्रेया खाजगीवाले,रो. निलेश शहा,रो. संजय मुनोत,रो. मनीष बोरा,रो. हितेश गुप्ता,रो. राजेश परदेशी,रो. निलेश मेहेर,रो. मनोज बाफना,रो. डॉ.दिलीप बागल, रो.दत्ता दिक्षित आणि क्लबचे सचिव रो.सुनील मुथा यांच्यासह अनेक रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष रो.अमर गुरप यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करत रोटरीच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवून " क्रिएट लास्टिंग इंम्पॅक्ट" या वर्षाच्या संकल्पनेनुसार समाजात चिरंतन प्रभाव निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. राजेश परदेशी यांनी प्रभावीपणे केले, तर रो.सुनील मुथा यांनी उपस्थित मान्यवर, डॉक्टर,सीए, शेतकरी आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.
समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com