पुण्यातील सुप्रसिद्ध बर्गर आता मिळणार नगरमध्ये
नगर : दर्शक ।
शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरत धर्माधिकारी मळा, पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर, सावेडी येथे ‘कॅफे मूड अँड बर्गर पॉईंट’ या आकर्षक कॅफेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. उद्योजक सुनीत सुधाकर ढगे आणि राहुल पाटोळे यांनी संयुक्तपणे या नव्या व्यवसायाची सुरुवात केली असून नगरकरांना दर्जेदार खाद्यपदार्थ, आधुनिक वातावरण आणि उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
उद्घाटन उद्योजक सुनित यांची आई सुलोचना सुधाकर ढगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बिशप ऑफ नाशिक रा. रेव्हरंड बिशप गायकवाड, धर्मगुरू अहमदनगर पहिली मंडळी सीएनआयचे रेव्हरंड सतिश तोरणे उद्योजक राहुल पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुनीत ढगे यांनी सांगितले की, नगरकरांना काहीतरी वेगळा आणि दर्जेदार खाद्य अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुण्यात लोकप्रिय असलेल्या ‘बर्गर पॉईंट’ची चव आता थेट अहिल्यानगरमध्ये उपलब्ध झाली असून बर्गरप्रेमींना आवडत्या चवीसाठी पुण्यापर्यंत जाण्याची गरज राहणार नाही. “नगर हे खवय्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील नागरिकांना नवनवीन चवींचा अनुभव घेण्याची आवड आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही पुण्याच्या प्रसिद्ध बर्गरची चव नगरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ, स्वच्छता, आकर्षक वातावरण आणि उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे ढगे यांनी सांगितले.
कॅफेचे नाव ‘कॅफे मूड’ ठेवण्यामागे ग्राहकांचा मूड आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. कुटुंबीय, मित्रमंडळी, तरुणाई तसेच खाद्यप्रेमींसाठी हे ठिकाण एक आदर्श भेटीचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उद्योजक राहुल पाटोळे यांनी सांगितले की, अहिल्यानगरातील नागरिकांना चव, गुणवत्ता आणि उत्तम सेवा यांचा संगम एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने आम्ही ‘कॅफे मूड अँड बर्गर पॉईंट’ सुरू केला आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि तरुणांसाठी आनंददायी वातावरणात दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. नगरकर या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.
कॅफेमध्ये ग्राहकांसाठी बर्गर पॉईंट स्पेशल चिकन बर्गर, चिकन किंग बर्गर, पनीर झिंगर बर्गर, तंदुरी पनीर पिझ्झा, पनीर मखानी पिझ्झा, पनीर चीज ग्रिल सँडविच, व्हाईट सॉस पास्ता, हक्का नूडल्स, पनीर चिली, ओरिओ शेक, नुटेला शेक आणि ब्लूबेरी मोजिटो यांसारखे लोकप्रिय पदार्थ उपलब्ध आहेत. याशिवाय फॅमिलीसाठी स्वतंत्र व प्रशस्त बसण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी आकर्षक चिल्ड्रन्स गार्डन, वाढदिवस व छोट्या सेलिब्रेशनसाठी विशेष जागा, सेल्फी पॉईंट, मोफत पार्किंग सुविधा, स्वच्छ व आरामदायी वातावरण तसेच जलद सेवा यामुळे ‘कॅफे मूड अँड बर्गर पॉईंट’ हे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि तरुणांसाठी एक आदर्श भेटीचे ठिकाण ठरत आहे.
नागरिकांनी एकदा तरी कॅफे मूड अँड बर्गर पॉईंटला भेट देऊन पुण्याच्या प्रसिद्ध बर्गरची चव अनुभवावी आणि स्थानिक उद्योजकतेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कॅफेच्या वतीने करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी रेव्हरंड जे आर वाघमारे, सुनीत ढगे, राहुल पाटोळे, पल्लवी पाटोळे, संचित ढगे, सुशील ढगे यांच्यासह नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com