दिल्लीगेट येथील प्रदर्शन व विक्री मेळाव्याला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीगेट येथील प्रदर्शन व विक्री मेळाव्याला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


  नगर : दर्शक । 

दिल्लीगेट येथील शमी गणपती मंगल कार्यालयात अमृत व प्रतिबिंब संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शमी गणपती हॉल,दिल्लीगेट येथे ३ ते ५ जुलै रोजी ३ दिवशीय बचत गटांचे उद्योजक प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनास अहिल्यानगर शहरातील ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.



या प्रदर्शनामध्ये हस्तकला, कपडे, ज्वेलरी,आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने, किड्स वेअर, फूड स्टॉल, उन्हाळी वाळवण, गृहपयोगी वस्तू, गिफ्ट आर्टिकल,गावरान मटकी, काराळे व धान्य असे विविध प्रकारचे स्टॉल्स असल्याने नगरच्या ग्राहकांना आकर्षित केले. 




         नगरकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नगरच्या मातीतील छोट्या उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी चांगली प्रेरणा मिळत आहे.तसेच स्वदेशी वस्तू व हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांनी पसंती दाखविल्याने उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीत वाढ होत आहे.असे प्रतिबिंब संस्थेच्या अध्यक्षा अनुजा कांबळे यांनी सांगितले आहे.