रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलतर्फे लोणी मावळा येथे ५० वृक्षांचे वृक्षारोपण
नगर : दर्शक । रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या वतीने डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत तालुका पारनेर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, लोणी मावळा येथे ५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यापूर्वी रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलने या विद्यालयास डीजी क्लासरूम प्रदान केली असून, त्याच विद्यालयात हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक राऊत सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यालयाची माहिती दिली. त्यानंतर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. अमर गुरप यांनी रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक सेवा कार्याची तसेच रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणविषयक प्रकल्पांची माहिती दिली.
यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे नियमित संगोपन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. वाढते तापमान, हवामानातील बदल आणि भावी पिढीचे सुरक्षित भविष्य लक्षात घेऊन प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष रो. अमर गुरप, सचिव रो. सुनील मुथा, रो. संजय मुनोत, रो. प्रभाकर बोगा, मुख्याध्यापक राऊत सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. संपूर्ण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com