HDFC ERGO NAGAR | मलेशियातील जागतिक परिषदेसाठी हेल्थ प्लॅनर सविता नितीन बोठे यांची निवड
नगर : दर्शक । एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्शुरन्सच्या वतीने मलेशिया येथे १ ते ५ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय जागतिक परिषदेसाठी अहिल्यानगर येथील हेल्थ प्लॅनर तथा श्रीराम इन्शुरन्स सर्व्हिसेसच्या संचालिका सविता नितीन बोठे यांची निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विमा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या जागतिक परिषदेसाठी संपूर्ण भारतातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोजक्या विमा सल्लागारांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अहिल्यानगरच्या सविता बोठे यांनी स्थान मिळवले आहे.
परिषदेत जगभरातील विमा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहून आरोग्य विमा क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक सेवा, नवीन पॉलिसी, ग्राहकाभिमुख योजना तसेच कंपनीची भावी ध्येयधोरणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. विविध तांत्रिक सत्रे, चर्चासत्रे आणि अनुभवांची देवाणघेवाण याद्वारे सहभागी प्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान मिळणार आहे.
या निवडीबद्दल एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्शुरन्सच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने सविता नितीन बोठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखेतील अधिकारी, विमा सल्लागार तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
सविता बोठे यांच्या या यशामुळे अहिल्यानगरच्या विमा क्षेत्राचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com