Rupavate College | गेल्या २० वर्षांपासून बौद्ध संस्कार संघाकडून विद्यार्थ्यांना सातत्याने शैक्षणिक मदतीचा हात
नगर : दर्शक ।
बहुजन शिक्षक संघाचे मुलांचे वस्तीगृह ,भीमा गौतमी मुलींचे वस्तीगृह तसेच दादासाहेब रूपवते हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच १०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला .
प्रमुख उपस्थिती (माजी अधीक्षक अभियंता विद्युत महावितरण कंपनीचे) दिलीप भोळे साहेब या प्रसंगी म्हणाले की दरवर्षी बौद्ध संस्कार संघाच्या उपकमांतून प्रयत्नपूर्वक शैक्षणिक साहित्य मदतीने मुलांच्या शिक्षणाला प्रेरणा मिळूत विद्यार्थी जीवन घडले आहे गेले 20 वर्षापासून या उपक्रमाला बौद्ध संस्कार संघांचे सदस्य नियमितपणे तन-मन धनाने मदत करत आहेत हिच मदत घेऊन अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर विविध क्षेत्रात नोकरी तसेच उत्तम व्यावसायिक बनले आहेत. पूर्वकालीन वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन घेऊनच समकालीन सेवानिवृत्त शासकीय अधिकारी समाजसेवा कार्यरत आहेत आणी पुढच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरत आहे हे मी अहिल्यानगरमध्ये नोकरी करत असताना वीस वर्षापासून अनुभवले आहे.
(वैद्यकीय अधिकारी बेगर्स होम विसापूरचे )डॉ. सुशील तुरुकमाने यांनी मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले की मी वैद्यकीय कॉलेज शिक्षण घेत असतांना बुद्धपौर्णिमा पाच दिवस धम्मसंस्कार शिबिरात प्रशिक्षण घेऊन बनलो आहे, तसेच माझे मुले परीवार दरवर्षी धम्मप्रशिक्षण घेत आहेत.
बौद्ध संस्कार संघ उपक्रमात - शैक्षणिक साहित्य गणवेश, स्कूलबॅग, वह्या पुस्तके दरवर्षी दहावीपर्यंत मदत घेऊन केतन भाऊसाहेब देठे यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिक बनला , आपलेकडूनही विद्यार्थ्यांना मदत करण्याची भावना निर्माण झाल्याने त्यानेही विद्यार्थ्यांना साहित्य व संस्थेसाठी टेबल फॅन दिला. दिलीप भोळे यांनीही दहा स्कूल बॅग दिल्या,प्राध्यापक दिलीप गायकवाड यांनी तीन डझन रजिस्टर नोटबुक व पेन मदत केली. उद्योजक श्रीरंग शेळके ,उद्योजक नानासाहेब डोईफोडे ,उद्योजक सिद्धार्थ भोसले यांनी दहा स्कूलबॅग व आठ डझन रजिस्टर नोटबुक मदत केली. डॉ. प्रा. किरणकुमार साळवे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.
यावेळी १२वी सायन्स मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम आलेली ९२ टक्के तानवडे ईशा आदिनाथ हिचा विशेष सत्कार करण्यात आला. देशमुख गायत्री विक्रम , मुळे ज्ञानेश्वरी हेमंतराव, शिंदे समृद्धी संतोष ,कोरडे ज्ञानदेव आर्यन, नरसाळे सपना रावसाहेब.
तसेच १०वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी सर, सामाजिक कार्यकर्ते अजय साळवे साहेब,महेश भोसले साहेब, एडवोकेट बळीराम ऊके, इंजि संजीव घोडके, बि .डी. शिंदे साहेब, प्रदीप साळवे साहेब, शशिकांत घोडके साहेब, एस के गायकवाड सर, सुरेश घायमुक्ते साहेब, प्रतिभाताई देठे, राजेंद्र थोरात साहेब ,डॉ.संजय शिंदे, भाऊसाहेब आव्हाड साहेब यांच्या हस्ते सत्कार व मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परवेक्षक प्रा.जयंत गायकवाड , बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी केले, प्रमुख मान्यवरांचा सत्कार प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी सर यांनी तर उपस्थितांचे आभार संजीवन साळवे यांनी केले .

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com