नगरमध्ये आज कमी दाबाने पाणी!पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना!

नगरमध्ये आज कमी दाबाने पाणी!


गुरुवार दि. २७/०८/२०२६ रोजी पहाटे शहर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने...

अशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आज अशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे प्रमुख भाग :

विभागपरिसर
शहर मध्यवर्ती भागसिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, गाडेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सावेडी
उपनगर भागबोल्हेगाव, नागापूर, केडगाव तसेच सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, लक्ष्मीनगर, तपोवन रोड, सूर्यनगर, निर्मलनगर आदी परिसर.

विशेष महत्त्वाची सूचना

गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी पाइपलाइन रोडचा संपूर्ण परिसर (ड्रीमार्ट  मॉलपासून श्रीराम चौकापर्यंत) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

या परिसरातील पाणीपुरवठा

उद्या शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येईल.

त्यामुळे नागरिकांनी कृपया याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा व पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत महानगरपालिकेस सहकार्य करावे.

अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर