Shirdi | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन व स्वागत
Shirdi | शिर्डी, दि.25/08/2026 | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्यांचे स्वागत केले. आगमनाप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, अमोल अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिर्डी विमानतळ येथून मोटारीने श्री क्षेत्र धनगरवाडी ता. राहाता येथे योगीराज सदगुरू श्री. गंगागिरी महाराज १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याकडे प्रस्थान झाले.



.jpeg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com