दिवंगत लोककलावंत प्रताप रोकडे यांना दिग्गज कलावंताची वंदन माणसाला कार्यक्रमातून आदरांजली
नगर : दर्शक । सिद्धार्थनगर येथील जेष्ठ लोककलावंत आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून सेवानिवृत्त कर्मचारी प्रताप तबाजी रोकडे यांचे रविवार दि. २ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पुण्यानुमोदन विधीच्या निमित्ताने शुक्रवारी संगीत बहार फाउंडेशन आयोजित, संगीत बहार गुरुकुल विहार आणि समस्त लोककलावंत आयोजित वंदन माणसाला या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कडुताई खरात,
श्वेताताई सभादिंडे, कल्पनाताई सूर्यवंशी, गायक रुपचंदजी भुजबळ, चेतनकुमारजी चोपडे, विकासजी साळवे, ज्ञानेश्वरजी खरात, अमोलजी साळवे, संगीतकार/गायक मोहितजी गांगुर्डे, गीतकार देवीदासजी भद्रे,
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीच्या गायनाचे व्यासपीठ मानले जाणारे दिव्यांग जेष्ठ गायक दादुकाका साळवे, अनिकेत गवळी ( ढोलक/ढोलकी ) वादक, अनिल घोगरे ( तबला वादक ), कुणाल वानखेडे ( कीबोर्ड ), सनी गणकवार ( पॅड ) यांनी आपल्या कलेतून सुरेल प्रबोधनात्मक आत्मकल्याणाची सुरेल आदरांजली वाहिली.
संगीत बहार फाउंडेशन च्या सुशीलजी रोकडे, योगेशजी तिवारी आणि समस्त रोकडे परिवार, सगेसोयरे, नातेवाईक कलावंत मित्र परिवार मंडळी आणि गुरुकुलातील साधकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, तसेच रवी जाधव यांनी साऊंड सिस्टम व सचिन साळवी यांनी छायाचित्रेकरिता परिश्रम घेतले.
प्रताप रोकडे हे संगीत बहार फाउंडेशन या संस्थेच्या कार्यकारणी पदावरही होते तसेच बासरीवादक जितेंद्र रोकडे व गायिका करुणा रोकडे यांचे ते वडील होते. हा कार्यक्रम अहिल्यानगर पोलिस मुख्यालय कल्याण केंद्र हॉल येथे संपन्न झाला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com