Rotary Club Nagar | लातूर येथे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 अचिव्हर्स अवार्ड सेरेमनी मध्ये रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलचा गौरव
Rotary Club Nagar | नगर : दर्शक । रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब म्हणजे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या 2025–26 या रोटरी वर्षातील "अचिव्हर्स अवार्ड सेरेमनी" मध्ये क्लबला तब्बल 12 मानाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले. लातूर येथे आयोजित या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात विविध सामाजिक, सेवाभावी आणि रोटरीच्या उपक्रमांमधील उल्लेखनीय कार्याची दखल घेत क्लबचा गौरव करण्यात आला.
हे पुरस्कार रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलचे अध्यक्ष रो. सुनील कटारिया आणि सचिव रो. अमर गुरप यांच्या 2025–26 या कार्यकाळातील उत्कृष्ट कार्याची पावती मानली जात आहे.
क्लबला प्राप्त झालेले 12 पुरस्कार बेस्ट बुलेटीन अवॉर्ड, टी आर एफ सेमिनार अवार्ड, बेस्ट ट्रस्ट मॅनेजमेंट अवॉर्ड, ब्लड डोनेशन कॅम्प अवॉर्ड, गर्ल्स एज्युकेशन अवॉर्ड, इंटरनॅशनल एक्सीलेंस अवॉर्ड, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सिटेएशन अवॉर्ड, डी आर एफ बेस्ट अवेन्यू डायरेक्टर अवॉर्ड, रो. हरीश नय्यर, टीआरएफ एक्सीडेंट अवॉर्ड, आऊटस्टँडिंग प्रेसिडेंट ऑफ द डिस्ट्रिक्ट अवॉर्ड रो. सुनील कटारिया, वूमन इनपाॅवरमेंट अवॉर्ड, स्पेशल ऍप्रिसिएशन अवार्ड फोर हाऊसिंग द टी आर एफ सेमिनार"किंडल" २०२५-२६,या सर्व पुरस्कारांमुळे रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या सेवाभावी कार्याला जिल्हास्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. क्लबच्या सर्व सभासदांनी, संचालकांनी, देणगीदारांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या समर्पित कार्य, सातत्यपूर्ण योगदान आणि सेवाभावामुळेच हा गौरव प्राप्त झाला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या शानदार पुरस्कार सोहळ्यास रो. सुनील कटारिया अध्यक्ष 2025–26, क्लब फर्स्ट लेडी रो. सुजाता कटारिया, रो. अमर गुरप सचिव 2025–26 व अध्यक्ष 2026–27, सौ. स्नेहा अमर गुरप क्लब फर्स्ट लेडी 2026–27, रो. हरीश नय्यर डिस्ट्रिक्ट TRF डायरेक्टर 2025–26 व AG 2026–27, ॲन्स डॉ. प्रीती नय्यर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर रो.प्रसन्न खाजगीवाले, पी डी जी व क्लब ॲडव्हायझर रो. शिरीष रायते, सौ. वैशाली रायते, क्लब ॲडव्हायझर व चार्टर मेंबर रो. डॉ.श्रीकृष्ण जोशी, ॲन्स सौ. वैजयंती जोशी, रो. प्रभाकर बोरा आणि ॲन्स सौ. सुरेखा बोरा उपस्थित होते.
या सोहळ्यास 11 महसूल जिल्ह्यांतील 104 रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव, असिस्टंट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, पीडीजीस तसेच सुमारे 600 रोटेरियन उपस्थित होते. सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात या पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेतला.
रोटरीच्या सर्विस अबाउ सेल्फ या मूलमंत्राला अनुसरून समाजाच्या विविध क्षेत्रांत सेवा देत असताना क्लबने केलेल्या कार्याला मिळालेला हा गौरव म्हणजे सर्व सदस्यांसाठी प्रेरणादायी क्षण आहे. या पुरस्कारांमुळे आगामी काळात अधिक जोमाने सामाजिक उपक्रम राबवून क्रियेट लास्टिंग इम्पॅक्ट निर्माण करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
या भव्य पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल होस्ट डिस्ट्रिक्ट 3132 चे डीजी 2025-26 रो. सुधीरजी लातुरे, डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी रो. संगीता लातुरे आणि डिस्ट्रिक्ट 3132 च्या संपूर्ण टीमचे रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या नियोजनबद्ध व शानदार आयोजनाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com