गुलमोहर फाऊंडेशन तर्फे गुणी विद्यार्थी व माजी विद्यार्थींचा सन्मान


नगर : दर्शक ।  मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुल मुकुंदनगर अहिल्यानगर येथील विद्यार्थिनी खान तरन्नुम अबुबकर-गोल्ड मेडलिस्ट (एम.एस्सी.) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-प्राध्यापिका, राधाबाई काळे महिला महाविद्यालय तसेच खान सना आरीफ (नेट/सेट उत्तीर्ण) प्राध्यापिका-राधाबाई काळे महिला महाविद्यालय या दोघींचा संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.




 

मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुल मुकुंदनगर अहिल्यानगर माहे मार्च २०२६ पुणे एसएससी बोर्डचे प्रथम शेख निदा नवेद, व्दितीय शेख मरीयम, तृतीय शेख जैनब वसीम तसेच आयडीयल विद्यार्थीनी बागवान ताहा या चौघींचा गुलमोहर फाऊंडेशनचे अध्यक्ष आय.एम. खान तर्फे रोख बक्षीस व संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह देण्यात आले.




 

तसेच मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज मार्च २०२६ एचएससी बोर्ड पुणेचे गुणी विद्यार्थिनी प्रथम-शेख रुखसार आसिफ, व्दितीय-शेख शैजीन जमील व तृतीय-शेख अलीजा शकील व आयडीयल विद्यार्थिनी खान शमा अतीक यांचे गुलमोहर फाऊंडेशनचे अध्यक्ष आय.एम. खान यांच्यातर्फे रोख बक्षिसे व संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.




 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज, प्रमुख अतिथी शेख अब्दुल अजीज अब्दुल रहेमान- अध्यक्ष मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी, अलाउद्दीन सर, सलीम खान, शेख लाल, फरीदा भाभी, मुख्याध्यापिका फरहाना बाजी, मुख्याध्यापक नौशाद सय्यद, अब्दुल हसीब शेख, यास्मिन बाजी, प्राथमिक शिक्षक वर्ग, माध्यमिक शिक्षक वर्ग, ज्युनिअर कॉलेज शिक्षक वर्ग, विद्यार्थिनींना उपस्थिती होते.



अब्दुल हसीब शेख यांनी सर्वांचे आभार मानले.