Nivedan | राष्ट्रीय हातमाग दिन (विणकर दिन) सरकार तर्फे साजरा व्हावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी 

Nivedan | राष्ट्रीय हातमाग दिन सरकार तर्फे साजरा व्हावा मंत्री आठवले यांच्याकडे मागणी





Nivedan | नगर : दर्शक ।        राष्ट्रीय हातमाग दिन(विणकर दिन) नगर शहरात शासनाच्या वतीने दरवर्षी साजरा करावा अशी मागणी जागतिक साळी संघटनेचे महेश कांबळे  यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या कडे केली त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. 





             निवेदनात म्हटले आहे कि गेली १० वर्षे हा दिन साजरी केला जातॊ परंतु शहरात एकदा फक्त राष्ट्रीय हातमाग मंडळाने प्रदर्शन घेतले होते पण दरवर्षी तो सार्वजनिक रित्या साजरा होत नाही,राष्ट्रीय हातमाग दिनाचे आयोजन जनतेमध्ये हातमाग उद्योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केले जाते. याचा उद्देश हातमाग क्षेत्रातील विणकर आणि कारागिरांना सक्षम करणे आहे,जे अनेकदा ग्रामीण आणि निम-ग्रामीण भागातील असतात, ज्यामुळे शाश्वत उपजीविकेला चालना मिळते.हा दिवस भारताच्या स्वदेशी हातमाग उत्पादनांची सांस्कृतिक समृद्धी आणि कलात्मकता अधोरेखित करतो, ग्राहकांना हस्तनिर्मित वस्तू निवडण्यास आणि 'व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडिया उपक्रमांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करतो.






           नगर शहरात साळी,कोष्टी,पदंशाली आदी विणकर समाजाची संख्या सुमारे १ लाख आहे तर जिल्ह्यात हि मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी आपल्या समाजकल्याण विभागामार्फत तो राबविला जावा  ७ ऑगस्टला ऐतिहासिक महत्व आहे या दिवशी विदेशी कापडाची होळी करण्यात आली म्हणून मा पंतप्रधान मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन(विणकर दिन) म्हणून घोषित केला व  २०१५  पासून  हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विणकरांचे संघटन करून  विणकर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी यासाठी प्रयत्न केले जावेत 






       शहरात राजकारणात व उद्योग व्यवसायात हा समाज पूर्वी आघाडीवर होता.परंतु गेली १५ वर्षात तो मागे पडला आहे या विणकर समाजाला  ओबिसि मधून एस बीसी प्रवर्गात टाकण्यात आले  विध्यार्थी वर्ग, नोकरदार,नोकरी, बढती , बदली मध्ये अनेकांना फायदे झाले आहेत ,तर उद्योगासाठी कर्ज पुरवठा होतो परंतु  बँका मंजूर करत नाही ,एसबीसी समाजाला सरकार १ लाख रुपये बिनव्याजी  देते,अनेक सवलती आहेत पण समाजाला त्या माहिती होत नाही . समाज बांधवानी अपडेट न राहता  व्यवसाय केला.त्यामुळे परंपरागत वस्त्र विणणे हा व्यवसाय बंद पडला, त्याला पुन्हा चांगले दिवस आले आहे व तो नगरमध्ये सुरु करण्यात येणार आहे  असेही महेश कांबळे म्हणाले