Rotary Club Nagar | दात हैं तो बात हैं अभियानाअंतर्गत रोटरी क्लब सेंट्रलच्यावतीने २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

Rotary Club Nagar | रोटरी क्लबच्यावतीने २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी




 


 Rotary Club Nagar | नगर : दर्शक ।  रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या वतीने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या "दात हैं तो बात हैं" या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६  रोजी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, लोणी मावळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.




या शिबिरात विद्यालयातील २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. प्रकल्पप्रमुख रोटे. डॉ. कुणाल कोल्हे (दंतचिकित्सक) यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून दंत आरोग्याचे महत्त्व, योग्य दंतस्वच्छता, संतुलित आहार तसेच भविष्यात दातांच्या समस्या टाळण्यासाठी आवश्यक उपचार वेळेत करून घेण्याचे महत्त्व विशद केले.






यावेळी रोटे.अमर गुरप (अध्यक्ष) यांनी रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जगभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, साक्षरता आणि विविध सामाजिक सेवा प्रकल्प राबविले जात असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत १ ऑगस्ट २०२६ ते ३१ मे २०२७ या कालावधीत १०० रोटरी क्लबांच्या माध्यमातून ५ लाख मोफत दंत तपासण्या करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.






या कार्यक्रमास रोटे. अमर गुरप (अध्यक्ष), रोटे. सुनील मुथा (सचिव), प्रकल्पप्रमुख रोटे. डॉ. कुणाल कोल्हे, रोटे. प्रभाकर बोगा, विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र राऊत,संतोष झरेकर, बाबासाहेब दौंड, सौ.अमृता लोंढे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.





हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला असून उपस्थितांनी रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.