अहमदनगर मुस्लिम फाउंडेशन च्यावतीने अपंग निराधार विधवा महिलांना आर्थिक सहकार्य

Social Work Nagar | निराधार महिलांना आर्थिक मदत करणे सामाजिक जबाबदारी आहे - ॲड.फारुक बिलाल


 




Social Work Nagar |  नगर : दर्शक ।  अपंग निराधार विधवा महिलांना आर्थिक मदत करणे ही केवळ समाजसेवा नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि गरजू महिलांच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.




आज देण्यात आलेली ही आर्थिक मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून त्यांना आत्मविश्वास, आधार आणि नव्याने जगण्याची प्रेरणा देणारी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी, संवेदनशीलता आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते.





आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करून या महिला नव्या उमेदीनं पुढे जातील, असा आम्हाला विश्वास आहे. समाजातील सक्षम व्यक्ती, सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांनी अशा गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सेंट्रल एडवोकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट फारूक बिलाल शेख यांनी केले.





अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांना आर्थिक मदतीचे वाटप ॲड.फारुक बिलाल यांच्या हस्ते करण्यात आले. व सेंट्रल एडवोकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ एडवोकेट फारुक बिलाल शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक हाजी शेख नजीर, अध्यक्ष डॉ. शेख सईद, सेक्रेटरी हाजी मुबीन तांबटकर, ट्रेझरर हाजी शेख सलीम आदी उपस्थित होते.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुस्लिम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेख सईद यांनी संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या वर्षभरातील विविध सामाजिक उपक्रमांची सखोल माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबीन तांबटकर यांनी केले. आभार शेख सलीम यांनी मानले.