शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार - चेअरमन उमर सय्यद

नेप्ती सोसायटीच्या  चेअरमन पदी उमर सय्यद तर व्हा. चेअरमन पदी  रोहिणी होळकर





नगर : दर्शक  | नगर तालुक्यातील नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या  चेअरमन पदी उमर अमिर सय्यद, तर व्हा. चेअरमन पदी रोहिणी भाऊसाहेब होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा माजी सहकार अधिकारी मंदाकिनी ठोकळ यांनी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दिली.


माजी चेअरमन सुरेंद्र होळकर आणि माजी व्हा. चेअरमन सादिक पवार यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या  चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी  सोसायटीच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने उमर सय्यद आणि रोहिणी होळकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.


चेअरमन उमर अमिर सय्यद यांच्या नावाचा प्रस्ताव जालिंदर बाबासाहेब शिंदे यांनी सुचविला, तर मुक्ता मल्हारी कांडेकर यांनी अनुमोदन दिले. व्हॉ. चेअरमन रोहिणी भाऊसाहेब होळकर यांच्या नावाचा प्रस्ताव राजेंद्र नाना जपकर यांनी मांडला, तर सादिक नथु पवार यांनी अनुमोदन दिले.


निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित  चेअरमन व  व्हॉ. चेअरमनचा  ग्रामस्थ, सोसायटी सदस्य आणि मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित  चेअरमन उमर सय्यद यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.


सय्यद म्हणाले, “विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून काम केले जाईल. तसेच शेतकऱ्यांना कर्जप्रकरणात आवश्यक ते सहकार्य करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न राहील.”


निवडणूक निर्णय अधिकारी मंदाकिनी ठोकळ यांनी निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. निवडीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, माजी सरपंच संजय आसाराम जपकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, माजी संचालक वसंत पवार, माजी उपसरपंच दादू चौगुले, फारुख सय्यद, रामदास फुले, बाबासाहेब होळकर, बंडू जपकर, राजाराम जपकर, मच्छिंद्र होळकर, अशोक जपकर, अंबादास जपकर, राजेंद्र जपकर, विलास जपकर, मल्हारी कांडेकर, सुरेंद्र होळकर, सादिक पवार, मुक्ता कांडेकर, सुरेश कदम, भास्कर जपकर, शांताबाई जपकर, भाऊसाहेब होळकर, जावेद सय्यद, प्रा. बाबुलाल सय्यद, गुलाब सय्यद, बादशाह भाई सय्यद, बबन सय्यद, अतुल जपकर, योगेश पवार, ज्ञानेश्वर जपकर, गोरख जपकर, सुभाष जपकर, सोमनाथ जपकर, बंडू कांडेकर, भाऊ होळकर, बाबासाहेब भोर, प्रा. एकनाथ होले, भागीनाथ जपकर यांच्यासह सोसायटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.