संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी इंग्लिश माध्यम सत्संग सोहळ्याचे आयोजन 

Sant Nirankari Nagar |




 Sant Nirankari Nagar | नगर :- निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमित जी यांच्या कृपाशीर्वादाने निरंकारी मिशनच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने युवावर्गासाठी झोनस्तरीय इंग्लिश मिडीयम समागम (EMS) निमित्त विशाल सत्संग सोहळ्याचे आयोजन केले असून रविवार (दि.13)रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत संजोग लॉन्स,नगर-मनमाड रोड येथे कार्यक्रम होईल.


 

यात नगर शहर व जिल्हा तसेच अहिल्यानगर झोन अंतर्गत येणाऱ्या शाखांपैकी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यातील युवा संत व साधसंगत चे भाविक सहभागी होणार असल्याची माहिती झोन 36A चे झोनल इन्चार्ज हरीश खुबचंदानी यांनी दिली.




           त्यांनी पुढे सांगितले की,जगातील 60 हून अधिक देशात पोहोचलेली संत निरंकारी मिशनची विचारधारा इंग्रजी या जागतिक भाषेमार्फत अधिक व्यापक स्वरूपात युवकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या कार्यक्रमाचा असून इंग्लिश भाषेत गीत, विचार,मनोगते, कविता,नाटिका आदींच्या माध्यमातून सदगुरुंची पावन शिकवण तसेच मिशनच्या दैवी मूल्यांचा संदेश या कार्यक्रमाद्वारे दिला जाणार असल्याचे खुबचंदानी शेवटी म्हणाले.



      तरी सदर आध्यात्मिक इंग्लिश माध्यमाच्या सत्संग कार्यक्रमास युवावर्गाने तसेच भाविकांनी उपस्थित रहावे अशी विनंती निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात आली आहे.