Ganesh Utsav Rahuri | ‘मला कारवाई करण्यास भाग पाडू नका!’ गणेश मंडळांना पोलिस अधीक्षकांचा इशारा





Ganesh Utsav Rahuri | गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेला नो एंट्री !


राहुरी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरातील गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाने यंदा शिस्त, कायदा, धाक आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा इशारा देतानाच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे आणि विशेषता डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडून नये असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी राहुरी तालुक्यातील गणेश मंडळांना दिले आहे.


राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवावे. मिरवणुकीत अशा प्रकारचे फोटो अथवा प्रदर्शन करू नका जे तुम्हाला भविष्यात अडचणीत आणू शकते. आमची तुमच्याशी कोणतीही दुश्मनी नाही. मात्र कायदा मोडला तर कारवाई करावीच लागेल. मला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका असा सज्जड इशारा त्यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.


राहुरीत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, राहुरी ही पुण्यभूमी असून येथील मंडळांनी महाराष्ट्र समोर आदर्श निर्माण करावा, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे, पोलीस रेकॉर्ड लिस्टवर असणाऱ्या गुन्हेगारांना वर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. 




तुम्ही त्या यादीत येऊ नका पुढील विसर्जन मिरवणूक तुमचे नाव पोलिसांच्या कारवाईच्या यादीत येऊ देऊ नका असा सज्जड इशाराही गणेश मंडळांना दिला. गणेश उत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक उपक्रम राबविण्याचे आवाहन करताना मंडळांनी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपवावी असे आवाहन केले. 



या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, तहसीलदार डॉ. अमित पवार, मुख्याधिकारी विद्या पाटील, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.