School bus Shrirampur | स्कूल बस व रिक्षांची पोलिसांकडून पाहणी
School bus Shrirampur | श्रीरामपूर | दर्शक | प्रतिनिधी : श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील विविध शाळांच्या बस तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांची पाहणी करण्यात आली.
यावेळी शालेय वाहनांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, वाहनाची क्षमता, सीसीटीव्ही कॅमेरा आहे का, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधा उपलब्ध आहेत का, याची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
तसेच सर्व शाळेच्या बसचालक व रिक्षाचालकांना विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणे व घरी पोहोचविणे ही चालकांची महत्त्वाची जबाबदारी असून, वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसवू नये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार असून, पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
वृत्त - दिपक कदम - श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग - समता मीडिया सर्व्हिसेस- श्रीरामपूर

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com