ADCC Nagar | जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार अक्षय कर्डिलेंचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ADCC Nagar | नगर : दर्शक । नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार अक्षय कर्डिले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष सुजय दादा विखे पाटील,आमदार संग्राम जगताप,आमदार पाचपुते,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे व्हाईस चेअरमन रभाजी सूळ,संभाजी लोंढे,संदीप कर्डिले, महायुतीचे पदाधिकारी यांच्यासह विविध गावचे सरपंच,ज्येष्ठ नेते मंडळी, मतदार,सोसायटीचे चेअरमन व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
अर्ज दाखल करण्यास साठी घरी प्रथम त्यांनी कर्डिले साहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले नंतर आई व पत्नीने त्यांचे औक्षण केले.घरून निघाल्यावर बाजार समितीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिवादन केलं.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले,तिथून ते पायी सारसनगर येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांसह गेले, तेथे प्रथम कार्यकर्त्यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पूजन केले यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी कर्डिले अमर रहे च्या घोषणा दिल्या
उमेदवारी अर्ज दाखल करताना अक्षय कर्डिले यांनी आपले वडील तथा दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणेच वेशभूषा परिधान केली. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने शिवाजीराव कर्डिलेंच्या आठवणींना उजाळा मिळाला.दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल २५ वर्षांच्या राजकीय प्रवासात शेतकरी, सहकार आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर काम करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.त्यांच्या राजकीय प्रवासाची आणि कार्यपद्धतीची आठवण करून देणारी वेशभूषा परिधान करून अक्षय कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात पाऊल ठेवले.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुढील काळात काम करण्याचा माझा प्रयत्न राहील,”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com