अॅड. साहिल समीर बोरा यांची जितो मुंबई क्वीन्स नेकलेस युवा अध्यक्षपदी निवड
नगर : दर्शक । नगरच्या मातीतून आपल्या कार्याची सुरुवात करून मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मुंबईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अॅड. साहिल समीर बोरा यांची जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) मुंबई क्वीन्स नेकलेस युवा शाखेच्या अध्यक्षपदी २०२६–२०२८ या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिवक्ता, आयपीओ सल्लागार तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, दक्षिण मुंबईचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अॅड. बोरा यांच्यावर सोपविण्यात आलेल्या या जबाबदारीमुळे अहिल्यानगरच्या सामाजिक व युवा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अॅड. साहिल बोरा हे अहिल्यानगरचे रहिवासी असून, त्यांचे वडील समीर बोरा हे देखील सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. ते जैन ओसवाल पतसंस्थेचे विद्यमान संचालक तसेच जैन ओसवाल युवक संघाचे माजी अध्यक्ष आहेत.
वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत अॅड. साहिल बोरा यांनी कायदा, व्यवसाय, सामाजिक आणि युवा क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. अहिल्यानगरपासून सुरू झालेला त्यांचा मुंबईपर्यंतचा प्रवास हा केवळ शहर बदलण्याचा नसून, कर्तृत्वाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करण्यासोबतच समाजासाठी योगदान देण्याचा आहे.
युवकांना एकत्र आणणे, त्यांना विविध क्षेत्रांत संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, यावर अॅड. बोरा यांनी सातत्याने भर दिला आहे. कायदा व व्यावसायिक क्षेत्रातील कार्यासोबतच युवक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जितो मुंबई क्वीन्स नेकलेस युवा शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवीन जबाबदारीबाबत अॅड. साहिल बोरा म्हणाले, “अहिल्यानगरपासून सुरू झालेला माझा प्रवास आज मुंबईत जितो मुंबई क्वीन्स नेकलेस युवा शाखेची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंत पोहोचला, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे केवळ पद नसून युवकांसाठी काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला कामातून न्याय देत युवकांसाठी आणि समाजासाठी नेहमीप्रमाणे कार्यरत राहीन.”
.आगामी कार्यकाळात युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासोबतच सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जितो मुंबई क्वीन्स नेकलेस युवा शाखेला अधिक सक्रिय व सक्षम करण्याचा अॅड. बोरा यांचा मानस आहे. त्यांच्या निवडीबद्दल अहिल्यानगरसह मुंबईतील विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com