वि. ल. कुलकर्णी शाळेचे निबंध स्पर्धेत यश
नगर : दर्शक । पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त आयोजित निबंध स्पर्धेत वि.ल. कुलकर्णी प्राथ. शाळे तील इ. ७वी ची विद्यार्थिनी कु. ईशिका राहुल चिलका हिने तृतीय क्रमांक पटकावला.
श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुल नेप्ती नाका येथे संपन्न झालेल्या बक्षीस समारंभात महानगरपालिका आयुक्त श्री यशवंत डांगे याच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व फेटा बांधून तिला सन्मानित करण्यात आले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव या विषयावर तिने निबंध लेखन करून पर्यावरणाच्या रक्षणातील आपली जबाबदारी स्पष्ट केली.
तिच्या या यशासाठी संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी अध्यक्षा श्रीम. विजयाताई रेखे , उपाध्यक्ष श्री.चंद्रशेखर कुलकर्णी , सेक्रेटरी श्री किरण वैकर , खजिनदार श्री उमेश रेखे , कार्यकारिणी सदस्य श्री महेश रेखे , श्री उदयकुमार भणगे, श्री उमेश नगरकर शालेय समिती सदस्य श्री विठ्ठल धिमते , श्री हेमंत जोशी व श्रीमती पद्मजा बोर्डे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारदे व सर्व शिक्षकांनी शाळेच्या शिरपेचात नाव खोवल्या बद्दल तिचे अभिनंदन व कौतुक केले .

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com