जिल्ह्यातील विविध पदांवर महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
नगर-पुणे येथे दिनांक ३ व ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विश्वमांगल्य सभा,पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वार्षिक बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सौ. रजनी मनोज भंडारी यांची विश्वमांगल्य सभेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती, संस्कार आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख सौ. स्वाती शिरसुल,अहिल्यानगर जिल्हा सहसंपर्क प्रमुख सौ.स्वाती पवळे,जिल्हा सदाचार सभा संयोजिका सौ.शिल्पा भदाणे, तर सौ.रूपाली मोहिते यांची जिल्हा बालसभा संयोजिका म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रजनी भंडारी व नूतन पदाधिकार्यांचे सौ धनश्री विखे सह अनेकांनी अभिनंदन केले आहे
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com