जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; विद्यालयाकडून अभिनंदन

कराटे स्पर्धेत सायली बडे हिला रौप्यपदक





नगर : दर्शक ।         जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या १०८ श्री महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सायली संतोष बडे हिने कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.


         सायलीने १७ वर्षांखालील मुलींच्या ४९ किलो वजनगटातील कराटे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.


          सायलीच्या या यशाबद्दल सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली शिरसाठ यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातील क्रीडा स्पर्धांमध्येही तिने अशीच यशस्वी कामगिरी करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या.


        क्रीडा शिक्षक महेंद्र थिटे यांचे सायलीला मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल त्यांनीही अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.