दिवाळीनिमित्त ‘स्वर दीपावली’ संगीत कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन

दिवाळीनिमित्त ‘स्वर दीपावली’ संगीत कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन




नगर : दर्शक |  दिवाळी २०२६ निमित्त दिव्यदृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्था आयोजित स्वरसृष्टी संगीत मंच यांच्या वतीने "स्वर दीपावली" या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग युवक-युवतींच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, मराठी, हिंदी, भक्तिगीते, गझल तसेच चित्रपट गीतांचा सुरेल आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.


हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता माऊली सांस्कृतिक सभागृह अहिल्यानगर येथे होणार आहे. कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, दिव्यांग कलाकारांच्या सादरीकरणातून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जाणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक म्हणून डॉ.दमन काशीद  यांच्यासह विविध संस्था व उद्योजकांनी सहकार्य केले आहे.

आयोजकांनी अहिल्यानगर व परिसरातील सर्व नागरिक, संगीतप्रेमी, सामाजिक संस्था, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास कुटुंबासह उपस्थित राहून दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले आहे.अधीक माहिती साठी संपर्क कृष्ण तवले मो.9850885946,सुनिल बाचकर मो.8888498992
सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.