भाऊ कलचुरीच्या स्मृतिदिना  निमित्त मेहेरप्रेमींचे कार्यक्रम संपन्न



         नगर : दर्शक -अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे  अध्यक्ष व बाबांचे रहिवासी मंडळ मधील  शेवटच्या उर्वरित सदस्य  कै. भाऊ कलचुरी यांच्या १३ व्या  स्मृतिदिना निम्मित  नगर केंद्रामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले  यावेळी अवतार  मेहेरबाबा ट्रस्टचे, मेहेरनाथ कलचुरी,  रमा कलचुरी यांच्यासह मोठ्या संखेने मेहेरप्रेमी व नगरकर  उपस्थित होते.







  

                 यामध्ये नगरसह परदेशातील मेहेरप्रेमींनी विविध कार्यक्रम सादर केले प्रथम अवतार मेहेरबाबा व भाऊजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर नगर सेंटर शॉर्ट धुन सादर केली,व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आल्या.




रामजू ओम्म,जॉर्डन,उमा देवी,हैदराबाद,श्रीमती टेंभेकर, मेहेराबाद,बॉबी बर्नस्टाईन पियानोसह,ओह मून शिंग हाय,जेसनची गिटारसह,पवन नाईक यांनी गाणी, भजने म्हटली मेहेर दर्शन  मनीषा दीक्षित यांनी सांगितले  मिनिटे. नगर केंद्रासह बाबादास आणि आकाश यांनी गाणेव बुज्जी यांचा डान्स झाला.



 

     मेहेरनाथ कलचुरी  यावेळी बोलताना म्हणाले भाऊ हिरा होते त्याचे आजही रोज  स्मरण होते ते   मेहेरबाबांच्या आश्रमात ,मंडळी मध्ये सगळ्यात लहान वयाचे ते होते.घरदार, संपत्ती सोडून ते सहभागी झाले होते   मेहेर बाबांच्या मृत्यूपर्यंत ते त्याच्या बरोबर होते.


  


 भाऊनी  अनेक लेखन जबाबदाऱ्या पार पडल्या ते अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे  अध्यक्ष झाले ते  त्यांच्या मृत्यू  २३ ऑक्टो २०१३ झाला. 







             भाऊ हे  लेखक, कवी, विश्वासु  प्रशासक, आणि मेहेर बाबांच्या मंडळी तील  एक व  मेहेर बाबांच्या जीवन तत्त्व चरित्रकार होते त्यांनी लॉर्ड मेहेर हे २० खंडात बाबाचे जीवन चरित्र लिहिले तर पद्य मध्ये मेहेर दर्शन लिहिले या शिवाय ६० पुस्तके तसेच गझल , भजन , नाटिका , बाबाचे तत्वज्ञान त्यांनी लिहिले असेही  ते म्हणाले  आरती, प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.