नगर शहर व जिल्हयातून हजारो अनुयायी रवाना

संत निरंकारी मिशनचा ७९वा वार्षिक संत समागम शुक्रवार पासून



नगर : दर्शक ।  सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या छत्रछायेखाली निरंकारी मिशनच्या वतीने चार दिवसीय 79वा वार्षिक संत समागमाचे भव्य आयोजन निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे शुक्रवार (दि.23) ते सोमवार (दि.26 ऑक्टो.) पर्यंत होणार असून संत समागमात नगर शहर व नगर जिल्ह्यातून तसेच अहिल्यानगर क्षेत्र(36अ) अंतर्गत येणाऱ्या शाखा बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आदि ठिकाणाहून हजारो भक्तगण उद्या रवाना होणार असल्याची माहिती मिशनचे अहिल्यानगर झोन प्रमुख हरीश खुबचंदानी यांनी दिली.





     या समागमात प्रत्येक पाऊल मानव कल्याणाच्या दिशेने अग्रेसर होईल, प्रत्येक भाव समर्पणात परिवर्तीत होईल आणि प्रत्येक हृदय प्रेमाच्या त्या दिव्यज्योतीने प्रकाशित होईल जी मानवतेला एकत्व, सदभावना आणि प्रभूभक्तिच्या सूत्रात बांधण्याचा संदेश देते, जिथे ब्रह्मज्ञानाने चेतना जागृत होते, जिथे सेवा हाच जीवनाचा संकल्प बनतो तिथेच संत समागम आत्मिक जागृतीचा असा पवित्र उत्सव बनतो, जो माणसाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि परमात्म्याशी जोडले जाण्याची प्रेरणा देतो,





 याचाच दिव्य अनुभव घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी तसेच विदेशातील हजारो श्रद्धाळू या पावन प्रसंगी एकत्र येऊन सत्संग, सेवा, प्रेम आणि भक्तीचा अनुभव घेण्यासाठी या दिव्य आध्यात्मिक संमेलनात सहभागी होणार आहेत.या संत समागमात शोभायात्रा, सेवादल रॅली,सत्संग, भक्तीगीते, बहुभाषिक कवीदरबार तसेच राजपिता व सदगुरू माताजींचे दररोज सत्राच्या शेवटी प्रवचन होतील.





    शेकडो एकरच्या निरंकारी आध्यात्मिक स्थळ येथे उभारण्यात आलेले भव्य, आकर्षक असे मुख्य प्रवेशद्वार विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे, तसेच सुरळीत संचालन, सहज ये-जा आणि श्रद्धाळूंना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने संपूर्ण परिसर चार प्रमुख भागांमध्ये विभागण्यात आला आहे.





सेवादल सदस्यांनी व अनुयायींनी कठोर व निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवाकार्यामुळे या स्थळाला एका सुंदर, भव्य आध्यात्मिक नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे तसेच निरंकारी प्रदर्शनी, प्रकाशन स्टॉल, लंगर, कॅन्टीन, प्याउ, पार्किंग आदि सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून सर्व व्यवस्था निरंकारी सेवादल सदस्य तन्मयतेने पार पाडतात.





    या पवित्र संत समागमात सर्व सज्जनांचे आणि श्रद्धाळू,भक्तांचे मनःपूर्वक स्वागत आहे, चला या आत्मिक मिलन आणि भक्तीच्या महासंगमाचा भाग बनू या, सदगुरूंचे दिव्य दर्शन व अमृतमय प्रवचनांचा लाभ घेऊया आणि आत्म्याला परमात्म्याशी जोडणाऱ्या या अद्वितीय प्रवासात सहभागी होऊन जीवनाला धन्य करूया, अशी विनंती मिशनच्या वतीने करण्यात आली आहे.