भंडाऱ्याची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात तुळजाभवानी पालखीचे गावोगावी स्वागत
नगर-जवळील बुऱ्हानगर येथील भगत मानकरी असलेल्या व सुमारे ८०० वर्षाची परंपरा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या पालखीचे आगमन नगर शहरात दि १२ ऑक्टोबरला नगरला आगमन होणार आहे अशी माहिती पालखीचे मानकरी सागर भगत यांनी दिली आहे
महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीची पालखी,बु-हाणनगर येथील पालखी राहुरी येथे तयार होऊन राहुरी तालुका, पारनेर तालुका, नगर तालुका, मधील सालाबाद प्रमाणे गावांना पालखी जाऊन तुळजाभवानी देवीची पालखी समोलंघनासाठी तुळजापुरला जाणार आहे.प्रत्येक गावात भंडाऱ्याची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात तुळजाभवानी पालखीचे स्वागत केले जात आहे
बु-हाणनगर देवी मंदीर येथुन पालखी दांडा पाळणा बनविण्यासाठी राहुरीकडे जातो तिथे पालखी तयार होऊन येथील पालखी मंदीरात दर्शनासाठी बसविण्यात येते २६ सप्टेंबर पासून पालखीचा प्रवास सुरु होतो दि १२ ऑक्टोबरला पालखी हिंगणगाव वरून नगर ला येणार आहे पूर्ण दिवसभर नालेगाव, पोलीस हेडक्वॉर्टर, सर्जेपुरा, रामचंद्र खुंट, येथे थांबून भिंगार कॅम्प बुऱ्हाणनगर जाणार आहे
गावोगावी पालखी जाऊन योग्य तिथीस योग्य वेळेस यात्रा भरत असून भाविक दर्शनासाठी गर्दी गर्दी करत आहे तर मुक्कामाच्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम देवीचा गोंधळ व भक्तिगीते ,भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.नवरात्रातील तिसऱ्या माळेला पालखी व पलंगाची भेट मिरवणूक भिंगार येथे होत असून दसऱ्याला पहाटे सिमोलंघना
तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला लागणारा पालखी घेऊन येण्याचा मान नगर तालुक्यातील बु-हाणनगर गावाला आहे. येथील रहिवासी भगत यांना आहे,दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी हीच मूर्ती पालखीत ठेवून मुख्य मंदिराभोवती मिरवली जाते. विशेष म्हणजे पालखी सीमोल्लंघनानंतर लगेचच तोडून होमात टाकली जाते.ज्याप्रमाणे तुळजाभवानीची मूळ मूर्ती काढून पलंगावर झोपवली जाते.दरवर्षी सीमोल्लंघन खेळण्याकरिता मूर्तिला पालखीतून मुख्य मंदिर परिसरात प्रदक्षिणा काढून मिरवले जाते.
पालखीचा प्रवास यशस्वी करण्यासाठी पालखीचे मुख्य मानकरी व बु-हाणनगर देवीचे पुजारी सुदाम जगन्नाथ भगत,ज्ञानेश्वर गोकुळ भगत,शिवराम उत्तम भगत,संतोष मधुकर भगत,देवीदास भिमराव भगत,सागर बाळासाहेब भगत,दिपक प्रभाकर भगत,वसंत गणपत भगत,निलेश बद्रीनाथ भगत, मंगेश शिवाजी भगत सह परिवार करत आहेत
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com